तळोधी वनपरिक्षेत्रातील कार्यरत पर्यावरणप्रेमी संस्था स्वाबच्या सदस्यांनी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी सात वेगवेगळ्या विषारी व बिनविषारी सापांना पकडून सुरक्षित जंगलात सोडून जीवदान दिले. तळोधी बा. परिसरात स्वाब संस्थेचे सदस्य सर्पमित्र जिवेश सयाम, महेश बोरकर, अध्यक्ष यश कायरकर यांनी तळोधी, वाढोणा, वलनी, कन्हाळगाव, सावरगाव, चिखलगाव अशा वेगवेगळ्या गावांमधील सापांना पकडून त्यांची तळोधी वनविभागात नोंद करून नाग, घोणस, मण्यार, धामन, डुरक्या घोनस या सापांना पर्यावरणमुक्त केले. या वेळी तळोधीचे क्षेत्र सहायक वाळके, वनरक्षक एस. बी. पेंदाम, वनरक्षक कुळमेथे आदी उपस्थित होते.