अकोला:-
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने २० फेब्रुवारी पासून राज्यव्यापी प्रलंबित मागण्यांना घेऊन संप सुरू केला होता त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांमध्ये प्रकल्प, जिल्हा, कार्यालय पातळीवर जबरदस्त आंदोलने केली.२८ फेब्रुवारी आझाद मैदानावर आपली ताकद उतरवली. त्यांची अपेक्षा होती की राज्य सरकारने भरीव मानधनवाढ द्यावी, मानधनाच्या निम्मी पेन्शन, नवीन मोबाईल, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅच्युइटी लागू करावी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा
अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. युनियनच्या शिष्टमंडळाला मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री, प्रधान सचिव, आयुक्त यांनी बैठकीसाठी निमंत्रित केले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी १०% मानधनवाढ द्यायचा प्रस्ताव मांडला तो युनियनने नाकारला आणि शेवटी धमासान चर्चेअंती *सेविकांना १५००/-रुपये मदतनिसांना १०००/-रुपये मानधनवाढ देण्याचे मान्य करण्यात आले
मिनी अंगणवाडी सेविकांना सेविकां इतके मानधन देण्याचा मुद्दा आपण आग्रहाने मांडला पेन्शन योजना लागू करण्याचे तत्वतः मान्य करण्यात आले. त्याचा तपशील आयुक्तांनी बैठक घेऊन चर्चा करून ठरवायचा आहे. नवीन मोबाईलसाठी ११५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.अंगणवाडीचे भाडे २०००/- ते ८०००/- इतके वाढवण्याचे मान्य केले. त्याचबरोबर जाचक अटी काढून टाकण्याचे सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले. ग्रज्युईटी लागू करण्याबाबत चर्चा करण्याचे मान्य केले.
*अंगणवाडी सेविकेच्या रिक्त पदी मदतीचा थेट नियुक्ती बाबत शैक्षणिक अट बाबत प्रधान सचिव आयुक्त यांच्याशी बसून निर्णय करण्याचे ठरले योग्य निर्णय प्रशासनाने दिल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या समक्ष बैठक घेण्याचे मान्य करण्यात आले.
आज जे काही मिळाले ते पुरेसे नाही परंतु जे काही मिळाले ते अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लढून मिळवले आहे. त्यांनी आपली ताकद पणाला लावून शासनाकडून हा अल्प का होईना पण विजय मिळवलेला आहे.
केंद्र सरकारने मागील पाच वर्षापासून केली नाही त्यामुळे केंद्र सरकारच्या वेतन वाढीसाठी २८ मार्च चलो दिल्ली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तयारीला लागावे अशी आवाहन आयटक राज्य सचिव कॉम्रेड नयन गायकवाड यांनी केले आहे
पुढील आंदोलनांमध्ये याहूनही जास्त ताकद लावली तर अजून जास्त काही मिळवून घेऊ शकतो असा आयटक संघटनेला विश्वास आहे. राज्य सरकारकडून थोडेफार मिळवले आहे आता केंद्र सरकारकडे वळायचे आहे. पुढचे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात होणार आहे. बजेटमध्ये केंद्र सरकारने मानधन वाढ द्यावी या मागणीसाठी आयटकचे संसद भवन दिल्ली येथे २८ मार्च रोजी आंदोलन केले जाईल.
शिष्टमंडळात कॉ. दिलीप उटाणे, कॉ. नयन गायकवाड यांचा समावेश होता.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढी बाबत विरोधी पक्षनेता अजितदादा पवार यांनी जोरदार मागणी लावून धरली व इतरही आमदारांनी मागणीला साथ दिली तर
आझाद मैदानावरील आंदोलनाला विरोधी पक्षाचे आमदार रोहित पवार, अदिती तटकरे, किरण लामटे, सुनील शेळके, अतुल बेनके, बाळासाहेब आजबे, दौलत दरोडा, भास्कर जाधव, राजु कारेमोरे, मनोहर चंद्रिकापुरे, ऋतुराज पाटील, काँग्रेस राज्य अध्यक्ष नाना पटोले यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
*शासनाशी झालेल्या या वाटाघाटीत युनियनने संप मागे घेण्याचे मान्य केले आहे. उद्यापासून सर्वांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहन युनियनने केले आहे. आझाद मैदानावरील आंदोलन देखील आज मागे घेतले आहे. त्यामुळे सर्वांनी आपापल्या जिल्ह्यात परत जायचे आहे आणि शक्यतो लवकर अंगणवाड्या सुरू करायच्या आहेत असे आवाहन कॉ. रमेश गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. सुनीता पाटिल जिल्हा अध्यक्षा व राज्य सचिव.कॉ. नयन गायकवाड आयटक राज्य कौंसिल सदस्य. व राज्य संगठन व जिल्हा सचिव* *कॉ. सुरेखा ठोसर, कॉ. सरोज मूर्तिजापुरकर, कॉ. दुर्गा देशमुख, कॉ. महानंदा ढोक, कॉ. सुनंदा पदमने, कॉ. आशा मदने, कॉ. मंगला अढावु, कॉ. त्रिवेणी मानवटकर, कॉ. ज्योती ताथोड, कॉ. कल्पना महल्ले, कॉ. वंदाणा डांगे, कॉ. मंगला मांजरे कॉ. माधुरी परणाटे, कॉ. सुमित गायकवाड, व सर्व तालुका कार्यकारीणी व स्मस्थ सभासद अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जील्हा शाखा अकोला आयटकच्या प्रयत्नाने.युनियनने केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....