श्री प्रवीण कोरगटीवार, जिल्हा समाज अधिकारी, पुणे यांच्या माननीय नामदार अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सार्वजानिक सेवेमध्ये अतिविशिस्ट कामगिरी साठी उत्कृष्ट अधिकारी प्रथम श्रेणी या सन्मानाने गौरव करण्यात आला. मूळच्या गडचिरोलीतील श्री प्रविण कोरगटिवार यांनी जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत अतिदुर्गम भागातील आसरली या गावात सर्वप्रथम प्राथमिक शिक्षक म्हणून सन 2000 मध्ये सेवारंभ केला. प्रस्तुत सेवेपेक्षा उच्च सेवा प्राप्त करण्याचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. सन 2008 मध्ये एम.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण करून ते मंत्रालय मुंबई येथे मंत्रालय सहाय्यक या द्वितीय श्रेणी अधिकारी पदावर रुजू झाले. त्याहून उच्च अधिकारी होण्याचा त्यांचा ध्यास होता, या प्रेरणेने ते शांत बसले नाही. सेवांतर्गत कालावधीत त्यांनी अभ्यासात खंड पडू दिला नाही आणि सन 2013 मध्ये त्यांना पुनश्च एम.पी.एस.सी या परीक्षेत राज्यात प्रथम मेरिट येण्याचा सन्मान प्राप्त झाला. संबंधित श्रेणीच्या राजकीय मानातून त्यांची निवड होऊन समाज कल्याण अधिकारी या पदावर पुणे येथे नियुक्ती करण्यात आली.
चांगल्यात चांगले करणे आणि चांगल्यात चांगले देणे या कार्य करण्याच्या प्रणालीमुळे त्यांना हा मान मिळाला. प्रस्तुत यशाकरता अनेक मान्यवरांनी गौरव केला.