कारंजा : वाशिम जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासाकरीता कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ. राजेंद्रजी पाटणी यांना शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळात स्थान मिळावे. अशी मागणी विदर्भ लोककलावंत संघटना वाशिमचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष - संजय कडोळे तथा सदस्य विजय पाटील खंडार, ओंकार मलवळकर, शेषराव इंगोले इत्यादीनी केली आहे. गेल्या जवळ जवळ पंधरा वर्षा पासून जिल्ह्याला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. त्यामुळे बाहेरचेच मंत्री पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे कामकाज बघत असतात. मात्र जिल्ह्याशी त्यांचा संपर्क नसल्याने किंवा येथील मतदारांशी काहीच घेणे नसल्याने बाहेरचे मंत्री झेंडावंदना पूरतेच मर्यादित राहत असल्याचा इतिहास आहे. आणि त्यामुळे नव्याने निर्मिती झालेल्या व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्याचा सर्वांगीन विकास खोळंबलेला असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या व कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीन विकासाकरीता स्थानिकचा पालकमंत्री मिळणे अत्यावश्यक आहे. आ. राजेंद्रजी पाटणी हे भाजपाचे ज्येष्ठ आमदार असून त्यांनी आजपर्यत एकवेळा विधानपरिषद आणि तिनवेळा विधानसभेतून कारंजा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलेले असून विकासपुरुष म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे लवकरच गठीत होणाऱ्या मंत्रीमंडळात त्यांची वर्णी लागावी अशी मागणी संपूर्ण कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातून होत असल्याचे सुद्धा संजय कडोळे यांनी म्हटले आहे .