गडचिरोली,(जिमाका)दि.21: जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक व उपजिल्हा रुग्णालय,आरमोरी यांच्या संयुक्तविद्यमाने आरमोरी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक यांचे संवेदीकरण कार्यशाळा केद्रींय प्राथमिक शाळा आरमोरी येथे घेण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी किर्तीकुमार कटरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महेश भांडेकर,तसेच विस्तार अधिकारी कु.पायल चौधरी,कु.निशीगंधा झूरे,प्रमुख मार्गदर्शक म्हणून एआरटी सेन्टरचे समुपदेशक संजय उमडवार,उपस्थित होते.
सर्व अंगणवाडी सेविका यांचे माता आणि बाल आरोग्याशी निगडीत सर्व दुवा आहे. त्यानुसार एचआयव्ही आजार, औषधोपचार, बाधित गरोदर माताची काळजी,नवजात बालकांचे संरक्षण,मानसिक तनाव,क्षयरोग,सिकलसेल आदि विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयसीटीसी समुपेदशक अशिक वासनिक प्रयोगशाळा तंत्रज्ञ गौरी साळवे यांनी केले.