मालवाहू वाहनाला ट्रकने मागून धडक दिली. यात मालवाहू वाहनातील चालक जखमी झाला. ही घटना लाखनी पोलिस ठाणे हद्दीतील पिंपळगाव टोली राष्ट्रीय महामार्गावर घडली. परसराम गणपत कागदे, रा. चांदोरी मालिपार असे जखमी झालेल्या मालकाचे नाव आहे. कागदे यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी ट्रक क्रमांक एम एच ३८ डब्ल्यू ०९६७ च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार रामटेके करीत आहेत.