नागभीड-- नागभीड येथील यशवंत खोब्रागडे हे भारतीय जीवन विमा निगम चे मेम्बर असून त्यांनी नागभीड येथे आपल्या सर्व ग्राहकांसाठी स्नेहमीलन सोहळ्याचे आयोजन केले होते. ज्यांचा बळाबर आपण आपल्या कुटुंबियांचे पालन पोषण करतो अश्या सर्व ग्राहकासोबत हितगुज व्हावी या हेतू ठेवत त्यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.यासोबतच नागभीड परिसरात विविध क्षेत्रात कार्यरत सेवाभावी हित जोपासणाऱ्या व्यक्तींचा सत्कार या सोहळ्यात करण्यात आला.. यात निसर्गमित्र झेप निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष पवन नागरे, सेंद्रिय शेती करणारे अरुनजी नरुले,नागभीड येथील प्रसिद्ध काष्टशिल्पकार सुनील ठाकरे,धनश्री पुरुष बचत गटाचे कार्यवाहक अनिलजी बहेकार यांचा सत्कार शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जनता शिक्षण संस्थेचे सचिव व ग्रामगीता विद्यालय चिमूर चे प्राचार्य डॉ.अमीर धम्मानी ,नागभीड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम पाथोडे ,विकास अधिकारी उल्हास अडबे ,ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकृष्ण देव्हारे यांचे उपस्थिती होती. प्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून यशवंत खोब्रागडे यांना पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यशवंत खोब्रागडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून आपला जीवन प्रवास तसेच या प्रवासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग भानारकर यांनी केले.