महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत "नभुतो न भविष्यती" अशाप्रकारची बंडखोरी होऊन एकनाथ शिंदे सह चाळीस आमदारांनी वेगळा गट काढून ते भाजपाला मिळाले . व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताच घाईगर्दीत एकनाथ शिंदे - देवेन्द्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी उरकून घेतला . आधी शिंदे गटाने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली तर नंतर शिवसेनेने व्हिपचे उल्लंघण केल्यामुळे बारा आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सुप्रिम कोर्टात नेले . आज युक्तिवाद सुरू असतांना शिंदे गटाकडून हरिश साळवे, शिवसेनेकडून कपिल सिब्बल, उद्धव ठाकरेंकडून महेश जेठमलाणी यांचा सुप्रिम कोर्टात युक्तिवाद सुरु . आमदाराच्या अपात्रते बदल च्या चारही प्रकरणाची पुढील सुनावणी करीता सुप्रिम कोर्टाने १ ऑगष्ट ही तारीख दिली . मोठ्या खंडपिठाकडे हे प्रकरण जाण्याची शक्यता असून अरुणाचल प्रदेशाच्या धर्तीवर ही केस चालण्याची शक्यता असून घटनापिठाने २७ जुलै पर्यत दोन्ही पक्षांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगतानाच सध्या १ ऑगस्ट पर्यंत स्थिती जैसे थे ठेवण्यास सुचवीले असल्याची माहीती महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशिम यांना प्रसार माध्यमाद्वारे मिळाली आहे. महाराष्ट्र स्मानी संकटाचा सामना करीत असतांना पाऊस,पूरामुळे गंभीर परिस्थिती उद्भवलेली असतांना मंत्रीमंडळाचा विस्तार मात्र लाबणीवर पडण्याची शक्यता आहे .