"वृद्ध कलावंत मानधन मंजूरीसाठी,मुख्यमंत्र्याचे निकटवर्ती अमोल पाटणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा."
वाशिम : सन २०२४-२५ च्या आर्थिक वर्षातील वृद्ध साहित्यीक कलाकारांची निवड यादी जाहीर करून त्यांना मानधन मंजूरी मिळावी याकरीता अखेर मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटणकर यांनी जिल्हाधिकारी यांचेशी भ्रमणध्वनीवर संवाद साधल्याने, सन २०२४-२५ ची लाभार्थी यादी लवकरच मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजने अंतर्गत,गरजू व खऱ्याखुऱ्या ज्येष्ठ लोककलावंताना मानधन मंजूर करण्यासाठी गेल्या विधानसभा निवडणूकांपूर्वीच,तत्कालिन पालकमंत्री ना.संजयभाऊ राठोड यांनी जिल्हा निवड समितीचे गठन करून,पकंजपाल महाराज राठोड यांना अध्यक्षपदी नियुक्त करून त्यांचे मार्गदर्शनात समिती स्थापन केली होती.या समितीने,दिपावली-२०२४ पूर्वी जिल्ह्यातील प्रस्ताव सादर करणाऱ्या इच्छुक मानधन लाभार्थी कलाकारांना,सहाय्यक उपायुक्त समाज कल्याण कार्यालय सभागृहात त्यांचे सादरीकरण व मुलाखती घेवून त्यांची निवड यादी संबधित प्रशासनाला दिलेली होती.परंतु या प्रक्रियेला नऊ दहा महिने कालावधी उलटूनही अद्याप पर्यंत,संबंधित प्रशासकिय अधिकाऱ्यांकडून मंजूरातच न मिळाल्याने सदर प्रस्ताव, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईकडे न जाता लालफितशाहीत अडकून पडल्याचे वास्तव होते.त्यामुळे सदरहू प्रस्तावाला मंजूरी मिळावी यासाठी अखेर विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी मॅडम यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली. शिवाय थेट ना.देवेन्द्रजी फडणवीस मुखमंत्री यांचे कार्यालयाकडे तक्रार करून त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोलभाऊ पाटणकर यांच्या वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. व जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले कार्यतत्पर व हजरजवाबी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोलभाऊ पाटणकर यांनी वाशिम जिल्हाधिकारी यांचेशी भ्रमणध्वनीवरून वार्तालाप करीत,जिल्हयातील कलावंताच्या मानधन लाभार्थ्यांची यादी लवकरात लवकर जाहिर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्याना सांगीतल्याचे विश्वसनीय वृत्त मिळाले असून लवकरच सन २०२४-२५ च्या नवीन लाभार्थ्यांचा मानधन मंजूरीचा प्रश्न निकाली लागणार असल्याचे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.