नागभिड---नागभिड व्यापारी संघाच्या वतीने नगरपरिषद नागभीड तेथे नगरपरिषद चे मुख्याधिकारी श्री राहुल जी कंकाल साहेब यांचेशी व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्लास्टिक बंदी विषयी चर्चा करण्यात आली. मा मुख्याधिकारी साहेबांनी कमी जाडीच्या प्लास्टिक, कॅरीबॅग तसेच ज्या प्लास्टिक वर बंदी घातली आहे त्यांचा वापर, विक्री करू नये असे आवाहन केले. व्यापाऱ्यांच्या प्लास्टिक विषयी अनेक प्रश्नांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केले त्यामुळे व्यापाऱ्यांचे समाधान झाले. व्यापाऱ्यांनी सुद्धा नियमांचे पालन करून सहकार्य करावे त्यामुळे कोणावरच कार्यवाही करावी लागणार नाही. सर्वोतोपरी सहकार्य व वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. व्यापाऱ्यांनी आम्ही पूर्णपणे सहकार्य करू असे सांगितले.
व्यापारी संघाद्वारे प्लास्टिक बंदी विषयी सर्व व्यापाऱ्यांना माहिती दिली तसेच नागरिकांनी सुध्दा प्लास्टिक चा वापर टाळावा असे आवाहन केले
या चर्चेला व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री गुलजार जी धमानी, माजी अध्यक्ष श्री हनिफभाई जादा इतर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.