कारंजा : दिनांक 07 मार्च 2025 रोजी सकाळी 9:00 वा. ग्रामपंचायत कार्यालय गायवळ परिसरामध्ये गाव समृद्धीकरिता जलतारा कार्यशाळा मा.तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.
यावेळी मा.तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी जलतारा शेती करिता नवा संजीवनी व सुख समृद्धी घेऊन येईल असे प्रतिपादन केले प्रत्येक शेतकऱ्यांनी एकरी एक जलधारा निर्माण करावा जलताऱ्याची निर्मिती करून गाव हे पाणीदार करावे या वेळी आवाहन केले मार्गदर्शनामध्ये मा. तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी जलतारा निर्मिती तंत्रज्ञान विषयी गावकऱ्यांना तंत्रशुद्ध माहिती दिली तसेच राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत एकरी एक जलतारा उभारल्यास शासनाकडून अनुदान मिळणार असल्याबाबत सांगितले. तसेच ग्रामवासियांच्या प्रश्नाचे शंका निवारण केले व या वेळी गावातील सर्व लोकांनी एकरी एक जलधारा उभारण्याबाबत प्रतिज्ञा केली. गावामध्ये आता पर्यंत दहा जलतारा निर्मिती झालेली असून पुढील सात दिवसांमध्ये 500 जलताराचे काम पूर्ण होईल असे आश्वासन कृषी सहाय्यक मंगेश सोळंके यांनी दिले ग्राम गायवळ येथे या आधी तालुकास्तरीय जलतरा निर्मिती कार्यशाळा मा. तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या मार्गदर्शनात पार पडली आहे त्याचे परिणाम तालुक्यातील बरेच शेतकऱ्यांनी जलताऱ्याची निर्मिती केलेली आहे गाव पातळीवरील जलतरा कार्यशाळे करिता मा. कार्यकारी सरपंच सतीश पाटील राऊत सह सर्व ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक राठोड साहेब, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथील मुख्याध्यापक येवले सर व त्यांची सहकार्य टीम तसेच शेतीनिष्ठ PDKV आयडॉल शेतकरी रवींद्र गायकवाड उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाळण्याकरिता दिनेश गायकवाड अक्षय माने, रमेश मार्गे ,अंकुश तुरक ,अंकुश मुंदे अरुण इंगळे व धिरज ढवळे ग्रामपंचायत कर्मचारी बंडू इंगळे व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी अतोनात परिश्रम घेतले असे असल्याचे प्रतिनिधी कारंजा यांनी कळविले