वाशिम : भारतवर्षातील मराठी कलाक्षेत्रातील अग्रणी असलेल्या,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,मुंबईच्या शताब्दी सोहळ्या निमित्त,पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे नुकतेच संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली,नाट्य परिषद अध्यक्ष प्रशांत दामले आणि विश्वस्त अशोक हांडे यांचे उपस्थितीत महानाट्यसंमेलन पार पडले. या नाट्य संमेलनाला वाशिम जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून अभा मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाचे लोकनियुक्त सदस्य नंदकिशोर कव्हळकर, उज्वल देशमुख आणि कारंजा शाखेचे अध्यक्ष प्रमोद जिरापुरे उपस्थित होते. या नाट्यसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधान परिषद अध्यक्ष रामसाहेब शिंदे हे आवर्जून उपस्थित होते.
त्यांच्या उपस्थितीतच अभा म. नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य नंदकिशोर कव्हळकर यांनी कारंजा शाखेची स्थापना झाल्यापासून आजतागायत पर्यंत कारंजा ह्या वैभवसंपन्न सांस्कृतिक कला नगरीत नाट्यगृह न मिळाल्या बाबत खंत व्यक्त केली. व कारंजा नगरीला नाट्यगृह मंजूर करण्याची गेल्या दहा वर्षाची मागणी रेटून धरली. त्या विषयावर बोलतांना, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष रामसाहेब शिंदे यांनी सांगीतले. मुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस आणि संबधित सांस्कृतिक मंत्र्यामार्फत कारंजा (लाड) येथील नाट्यगृहाला लवकरच मंजूरी मिळवून देवू. महाराष्ट्रातील एकूण ९२ नाट्यगृह संकुलाचा आढावा घेवून काही ठिकाणी नव्याने नाट्यगृह देण्यात येतील तर काही ठिकाणी नाट्यगृह दुरुस्ती डागडूजी व रंगरंगोटीची कामे पूर्णत्वास नेऊन सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगीतले. त्यांनी दिलेल्या आश्वासनाबाबत नंदकिशोर कव्हळकर यांनी विधान परिषदेचे अध्यक्ष रामसाहेब शिंदे तथा नाट्य परिषदेचे आभार मानले