कारंजा : राष्ट्रिय काँग्रेस मधील जुने जाणते हिंदु मुस्लिमांमधील एकमेवाद्वितीय लाडके लोकप्रिय नेते तथा कारंजा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया हे स्थानिक राष्ट्रीय काँग्रेसचे भिष्म पितामह म्हणून ओळखल्या जातात.त्यांच्या प्रामाणिक, मनमिळाऊ व विश्वासार्हतेमुळे,केवळ कारंजा मतदार संघच नव्हे तर संपूर्ण वाशिम जिल्ह्यासह यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात त्यांना मानणारा फार मोठा सर्वधर्मिय जनसमुदाय असल्यामुळे त्यांच्या शब्दाला मतदारांमध्ये वजन आहे.त्यामुळे त्यांचेकडे कोणत्याही निवडणूकीची जबाबदारी सोपविल्यास उमेद्वाराला निवडणूक लढविणे सोपे जाते.हा आजपर्यंतचा इतिहास आहे. तसेच स्थानिक पक्ष कार्यकर्त्याच्या नियुक्त्या करतांना त्यांना डावलून नियुक्त्या केल्यास त्याचा देखील फटका अंतर्गत काँग्रेस पक्षाला बसू शकतो हे देखील कटूसत्य आहे.कारण अखेर "हिऱ्याची पारख केवळ जौहरीच" करू शकतो.हे देखील राजकारण करतांना वरिष्ठ नेत्यांनी जाणले पाहिजे.असे मत त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या शुभेच्छा कार्यक्रमामधून आदर्श नेता राज्यस्तरीय पुरस्कार तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ दिव्यांग जनसेवक संजय कडोळे,टिपू सुल्तान सेनेचे जिल्हाध्यक्ष अब्दुल राजिक शेख, ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रदिप वानखडे इत्यांदीनी बटुकभाई उपाख्य अरविंद लाठीया यांच्या वाढदिवसानिमित्त विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा द्वारा आयोजीत कार्यक्रमात व्यक्त केले आहे.याबद्दल अधिक वृत्त असे की, नुकताच बटुकभाई उपाख्य अरविंद लाठीया यांचा वाढदिवस पारिवारिक कार्यक्रमात आयोजीत करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे,माजी सरपंच प्रदिप वानखडे,अभा मराठी नाट्य परिषद मुंबईचे नंदकिशोर कव्हळकर,महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक नाट्य परिक्षण समितीचे अशासकीय सदस्य रविन्द्र नंदाने,आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर गरड, डॉ आशिष सावजी,गोपिनाथ डेंडूळे,डॉ मिर्झा,ईरो फिल्मस् चे संचालक डॉ इम्तियाज लुलानिया,रोमिल लाठीया,हाजी रऊफखान (मामू), शिवसेनेचे नेते सलिमभाई तेली,टिपू सुल्तान सेनेचे जिल्हाध्यक्ष अब्दुल राजिक शेख,अड फारूक खान,रफत काज़ी अताउल्लाह खान,तैसिफ खान,कैलास हांडे,उमेश अनासाने,विजय खंडार,देविदास नांदेकर इत्यादींनी सर्वप्रथम शाल आणि पुष्पगुच्छ देऊन बटुकभाई यांचे अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केले.आणि वाढदिवसाच्या हार्दिक - शुभेच्छा दिल्यात.असे वृत्त अब्दुल राजिक शेख यांनी कळवीले आहे.