पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते एकत्र आल्याने मनुष्याचे शरीर बनतं. पृथ्वीमुळे शरीराला जडत्व येते. तेज म्हणजे अग्नी. शरीरातील ऊर्जा, उष्णता हे या अग्नीच प्रतिक. वायू म्हणजे शरीराचा प्राण. आपण श्वासोश्वास करतो म्हणजेच शरीरात वायू तत्वाचा वावर असतो. पंचमहाभूतापैकी आकाश हे अभौतिक तत्व आहे. आकाशाची तुलना मानवाच्या मनाशी केली जाते. आकाशा प्रमाणेच मन अनंत असतं. मनाला बंधनामध्ये बांधता येत नाही. आप म्हणजे पाणी, जल. जलामुळे शरीराला तरलता मिळते. अन्नातून मिळणारी ऊर्जा, पोषक घटक एका जागी साचू न देता संपूर्ण शरीरभर पोहचविण्यात हे पाणी, रक्त शरीरात वाहत असतात.
ये माटी की काया ।
बंदे माटी मिलेगी ।
तेरे पिछे इन्सान किरत रहेगी ।।
हे शरीर एक यंत्रच आहे. हे मातीचे शरीर एक दिवस पंचतत्वांत विलीन होणार. हे शरीर मातीचे बनले असल्यामुळे एक दिवस मातीमध्ये समाविष्ट होईल, म्हणूनच हे शरीर मातीचे आहे. जन्म मृत्यू हे आयुष्याचे चक्र आहे आणि ते कुणालाही चुकले नाही. नुसते जन्माला येणे व आयुष्य संपल्यावर मरुन जाणे, अशा जीवनाला काही अर्थ नाही. जीवन तर प्राणीही जगतात. प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनात अशाप्रकारे जगावे की शरीराने मरुन सुद्धा तो कीर्तीरुपाने जिवंत राहिला पाहिजे. यासाठी सत्कृत्ये करावे लागतील. ज्यायोगे आपली कीर्ती सर्वत्र होईल व आपण मरण पावलो तर लोकं आपले नाव घेत राहतील. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शिवाजी महाराज, महात्मा गांधी वगैरे व्यक्ती मरण पावल्या पण आजही त्यांची कीर्ती शिल्लक आहे. "मरावे परी कीर्ती रुपे उरावे !"
यहाॕ किसने लाया है, लाख खजाना ।
दो दिनकी जिंदगी, प्यारे फिर तुझे जाना ।
कहे दास संत, मत भुलो उसीको ।
उसीको भुलोगे, सारी नैय्या डूब जायेगी ।
आपण जन्माला येताना सोबत काहीच घेऊन आलो नाही आणि मेल्यानंतर सोबत काहीही घेऊन जाऊ शकत नाही. आपल्याला दोन दिवसाचे जीवन मिळाले म्हणजेच कधी आपला मृत्यू होईल हे कुणालाही माहीत नाही. जीवनाचा चांगला उपभोग घे. नंतर जेथून आला तेथे परत जायचे आहे. राष्ट्रसंत म्हणतात, तुला मनुष्य जन्म मिळाला आहे तर त्या ईश्वराला विसरु नकोस. ईश्वर चिंतनाला लाग. नामस्मरण कर. जो ईश्वराला आपला सोबती बनवितो त्याची नाव कधीही बुडत नाही. हा भवसागर तरुन जाता येईल.
वैसे तो जिते यहाॕ किडे मकोडे ।
होटलमें खाता, फिरता भजीये पकोडे ।
अरे रात दिन फिरता, करता बुराई ।
तेरे किये पर तुझको, शरम न आयी ।।
या पृथ्वीवर किडे, मुंगी, माकोडे सतत कर्म करीत आपले जीवन जगतात. तू सुटबूट घालून बिनकामाचा फिरतोस आणि हाॕटेलमध्ये जाऊन भजे, पकोडे खातोस. तुला रात्रंदिवस दुसरे कोणतेच काम नाही का? फक्त दुसऱ्याचं भलं, चांगलं करण्याचा विचार तुझ्यात नाही. तर दुसऱ्याचे वाईट करण्याचा प्रयत्न करीत असतो. दुसऱ्याला त्रास, दुःख देतोस. तुला अशा वागण्याची काही लाज, लज्जा आहे की नाही. मनात येईल असे वागतोस.
अपने लिये जो जिता, ओ जिना नही है ।
जो सेवामें मरता, ओ मरना नही है ।
कहे दास तुकड्या, कुछ करले भलाई ।
भलाई से जगमे शमा जलेगी ।।
मनुष्य जीवन जगण्याचा उद्देश फक्त स्वतःकरिताच पाहतो. तू बायको, मुले यांच्याकरिता जीवन जगतो. दुसऱ्या करिता जीवन जगून तर बघ. आपल्या जीवासारखे जीव सृष्टीत अनेक जीव आहे. "तु माझं माझं म्हणतं, पण सार नाशिवंत" आहे. आपण जीवन जगताना जमेल त्याच्या जगण्याला आपला हातभार लावला तर? आपल्या जगण्याला खरचं अर्थ प्राप्त होईल.
सेवा म्हणजे एखाद्या दिवस दया करुन उजळ करा, दुसऱ्याची काळजी घ्या. सेवेच्या कृत्यांनी माझ्यामध्ये नेहमी लोकांचे जीवन चांगले बनविण्याची इच्छा निर्माण झाली . सेवा हा इतरांसाठी केलेला कार्यक्रम समजावा. दुसऱ्याला मदत करणे, सात्वन देणे, सहकार्य करणे. जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा ते इतरांची सेवा करणे म्हणजेच तुमच्या जीननातील प्रकाश उजळण्याचा, इतरांना बरे करण्याचा एक सोपा मार्ग आहे. दुसऱ्याचे सेवेत मरणे हे मरणे नाही आहे. दुसऱ्या माणसाबद्दल सहानुभूती बाळगणे हा तुमचा स्वभाव असावा.
भलाई म्हणजे दुसऱ्यांसाठी चांगले काम करणे होय. कल्याण करणे म्हणजेच भलाई. शमा म्हणजे दिवा, प्रकाश होय. दुसऱ्याचे जीवन प्रकाशमय करा. शमा म्हणजे आज्ञेचे पालन करणे. आपण चांगले कार्ये केले तर जगचं प्रकाशमय होईल. जसे- फकडी जळणाऱ्या दिव्यावर झडप घेते, ती मरणाला सुद्धा सामोरे जाते. मरणाची पर्वा न करता सतत कर्म करावे.
शमा परवाने को जलाना सिखाती है ।
शाम सूरज को ढलना सिखाती है ।
गिरनेवालो को तकलीफ तो होती है ।
पर ठोकर ही इन्सान को,
चलना सिखाती है ।।
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....