कारंजा : कारंजा शहरातील अल्पावधितच लोकप्रिय ठरलेल्या सुप्रसिद्ध असलेल्या, दैनिक "सुर्वण महाराष्ट्र" चे संस्थापक संपादक अंकुश कडू पाटिल, छत्रपती शिवाजी महाराज समाजसेवक पुरस्कार विजेते, परिवर्तन बहु.उद्दे.संस्थेचे अध्यक्ष तथा रक्तदान चळवळीचे खंदे समर्थक पंकज दिलीप पाटील रोकडे तथा हरिश रोकडे या त्रिमुर्तीच्या वाढदिवसानिमित्त कारंजा पत्रकार मंच कारंजा, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद कारंजाकडून मृगधारा संमेलनात, मित्रमंडळीनी वाढदिवसाचा केक कापून आणि शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून भव्य सत्कार केला. यावेळी झालेल्या मृगधारा संमेलनाचे अध्यक्षस्थानी, कारंजा पत्रकार मंचाचे अध्यक्ष दिलीप पाटील रोकडे हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये कारंजा मेट्रोचे संपादक विलासराव राऊत, कारंजा शहरातील एकमेव महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त पत्रकार संजयजी कडोळे हे होते. याप्रसंगी वर्तमान परिस्थितीतील समस्या आणि पत्रकाराला येणाऱ्या अडचणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी कारंजा पत्रकार मंच एकसंघ असून पत्रकाराच्या सर्वांगीन विकासाकरीता कटीबद्ध असल्याचे दिलीप रोकडे, संजय कडोळे, विलास राऊत यांनी सांगीतले कार्यक्रमाला विजय गागरे, चॉदभाई मुन्निवाले,विजय पाटील खंडार, अनिकेत भेलांडे, एकनाथ पवार, किरण क्षार, निलेश काळे, मोहम्मद मुन्निवाले , उमेश अनासाने, जहीरभाई, आशिष कश्यप, निलेश कंटाळे, गणेश साखरे, संकेत देशमुख, कैलास हांडे, इत्यादी पत्रकार मंडळी हजर होती. असे प्रसिद्धी पत्रकात विजय पाटील खंडार यांनी कळवीले आहे.