कारंजा (लाड) : भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणारे धडाडीचे युवा पत्रकार किरण क्षार यांची एका पत्रान्वये नुकतीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी यांनी, पत्रकारीता क्षेत्रातील पत्रकारांच्या अग्रणी असलेल्या,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या संघटनेचे,वाशीम जिल्हा ग्रामिण जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. किरण क्षार हे विविध सामाजिक संघटनांशी जुळलेले असून, ते माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणूनही सुप्रसिद्ध आहेत. पत्रकारीता जगतामध्ये भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नियुक्ती मुळे तळागाळातील ग्रामिण क्षेत्रातील तसेच साप्ताहिकाच्या लघु पत्रकारांचे यशस्वी संघटन होऊन त्यांच्या न्याय्य हक्कांना वाचा फोडली जाणार असल्याची अपेक्षा साप्ताहिक करंजमहात्म्यचे संपादक तथा महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित असलेले ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे कारंजा नगरीतील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकिय क्षेत्रामधून स्वागत होत असून त्यांचेवर सर्वत्र अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराकडून संजय कडोळे,प्रदिप वानखडे, विजय खंडार,उमेश अनासाने, रोहित महाजन, नंदकिशोर कव्हळकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.