कारंजा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या कारंजा तालुका अध्यक्षपदी प्रकाश आडे यांची नियुक्ती दि. ९ जानेवारी रोजी, प्रदेश अध्यक्ष गजानन वाघमारे यांनी नियुक्ती पत्र देउन केली आहे.
ग्रामीण पत्रकारासाठी झटणारे बंजारा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, प्रकाश आडे हे सामाजिक, राजकीय क्षेत्रात नेहमी कार्यरत असल्यामुळे , त्यांच्या उत्कृष्ट कार्याची आणि मनमिळाऊ स्वभावाची,दखल घेउन त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे तसेच संघटनेचे शैलेश अलोने, राजेष डांगटे, अविनाश राठोड, साहेबराव खंडारे, दिलीप गि-हे, बाळासाहेब रामचवरे यांची कारंजा येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमा उपस्थित होती. आडे यांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील विखुलेल्या पत्रकारांना एकत्रीत करून संघटन मजबुत करण्याचा विश्वास यावेळी प्रकाश आडे यांनी व्यक्त केला. असे वृत्त संजय कडोळे यांना मिळाल्याचे त्यांनी कळविले आहे.