कारंजा:- 6 ऑक्टोबर 2023 रोजी सिध्द सद्गुरु शांतिनाथ महाराज यांचा जन्मदिन सोहळा श्रीनाथ योगाश्रम रामगाव रामेश्वर तालुका जिल्हा यवतमाळ येथे मान्यवरांचे उपस्थित आणि हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पश्चिम महाराष्ट्रातून कार्यक्रमास आलेल्या भक्तांनी महाराजांचे सानिध्यातून आलेले अनुभव कथन केलेत असता त्यावर विदर्भातून आलेल्या एका भक्तांनी महाराजांचे सानिध्य आता आम्हास मिळण्यासाठी महाराजांनी आम्हास येथे वेळ घ्यावा असे सांगितल्यावर महाराजांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, हा दिवस तुम्हा सर्वांना भाग्याचा आहे .मला तुमच्या भाग्यातला थोडा भाग मिळाला आहे .सर्व कार्याचे साधन शरीरआहे. शरीराचे अस्तित्व कोठेही असेल माझेच नाही सर्वांचे. त्याला देश काल भेद संभव नसतो. हि साधूंची संतांची उच्चतम भूमिका आहे. सामान्य माणसाची कल्पना असते. आयुष्याचा काही काळ इकडे गेला काय आणि तिकडे गेला काय तो भाग वेगळा आहे पण विचार सरणी जी आहे सर्वत्र सम या भूमिकेला आमच्या नाथ संप्रदायाच्या परंपरेमध्ये प्रामुख्यानं सर्वत्र सम दर्शन: ही भूमिका कायम आहे. हा सिद्धांत आमचा सगळ्यांचा हृदयाचा गाभा आहे .मग ते पश्चिम महाराष्ट्र असो पूर्व महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्र असो विदर्भ म्हणा ही कल्पना तुम्ही बाजूला काढून टाकली तर फार चांगल होइल.असे सिध्द सदगुरू शांती नाथ महाराज यांनी सांगितले .
साधूच्या आयुष्यातील काळ त्याने कोठेही व्यतीत केला तरी त्याचे सानिध्य क्षेत्र सर्व व्यापकच असून ते तुमच्या पर्यंत असते तेव्हा साधुने आपल्या क्षेत्रातच रहावे ही तुमची कल्पना सर्व प्रथम मनातून काढून टाका असे शांतीनाथ महाराजांच्या बोलण्यातून मतितार्थ निघतो.
कार्यक्रमाची सुरूवात काशीविश्वेश्वराचा अभिषेक , सिध्द सदगुरू गोरक्षनाथ महाराज पूजन, सिध्द सदगुरू रामनाथ महाराज पूजन करुन कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी भक्तांनी श्रीनाथ योगाश्रम प्रवेश द्वारा वर फटाकेची आतिश बाजी करुन रस्त्याने दुतर्फा रांगोळी काढून पुष्प वृष्टी केली.महाराज व्यासपिठावर पोहचल्यावर सर्व प्रथम सिध्द सदगुरू रामनाथ महाराज, सिध्द सदगुरू ओंकारनाथ महाराज,सिध्द सदगुरू गोरक्षनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन, सर्व मान्यवर संत मंडळी यांचे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यसनमुक्ती सम्राट मधूकर महाराज खोडे, प्रमुख पाहूणे माजी अध्यक्ष जिल्हा परीषद यवतमाळ सर्वश्री राहुलभाऊ ठाकरे, हभप रामेश्र्वर महाराज खोडे,माजी नगराध्यक्ष नगर परीषद दीग्रस विजय कुमार बंग, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीरभाऊ देशमुख, श्री.गुरू आदीनाथ वैष्णव योगपिठ सेवाभावी ट्रस्ट, आळंदी रामअण्णा नागवडे, विनायकराव भेंडे, माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे, डॉ.राजीव काळे ,श्रीधर पाटील कानकिरड, देवव्रत डहाके, राजेंद्र थोरात साहेब,मंगलनाथ महाराज, धर्म नाथ महाराज.विष्णुनाथ महाराज,महेश नाथ महाराज, संतोषनाथ महाराज, पवन महाराज, स्वामीजी महाराज इत्यादी होते तसेच आशाबाई वाघमोडे, सौ. तेजस्वीनीताई डहाके , सौ.वृशालीताई ठाकरे, उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे यशस्वी करिता सर्वश्री योगीनाथ चौधरी ,लोडम सर, ऋषिकेश महल्ले, मोहन वानखडे, देवनाथ भोयर, गिरधर चौधरी, चेतन धोटे, पुरूषोत्तम गुंजाटे, अभिजीत चौधरी, पंकज ठाकरे, अमोल भिंगारे, प्रवीण भिंगारे, अशोकराव राउत, ठाकरे सिरसगाव, संकेत नाखले, श्रेयस कानकिरड, पुंडे भाऊ, केणे साहेब, चव्हान, संतोष पोदाडे, प्रशांत चौधरी, डॉ सुर्वे, नरेन्द्र ठाकरे, दत्ता पाटिल महल्ले इत्यादी होते. या कार्यक्रमास हजारच्या संख्येने भक्तगन उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन राजीव ढोले सर यांनी केले,आभार देवनाथ भोयर यांनी मानलेत.
आपल्या प्रतिक्रिया द्या....