वाशिम, (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम हाती घेतले आहे. त्यानुसार मेरी माटी मेरा देश हे अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत अमृत सरोवर, जलकुंभ, तिरंगा यात्रा, स्वच्छता प्रतिज्ञा, वृक्षारोपण, अमृत सरोवराच्या ठिकाणी मुलांसाठी विविध स्पर्धा, अमृत सरोवराच्या ठिकाणी ग्रामीण खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. 17 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय कलश एकत्रीकरणाचा कार्यक्रम महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी, एनवायके, भारत स्काऊट गाईड्स, अंगणवाडी कर्मचारी आणि इरत युवक स्वयंसेवक कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता अमृत कलश जिल्हाधिकारी कार्यालय येथून मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत संख्येने उपस्थित रहावे. असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.