कारंजा-प्रतिनिधि
दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता महात्मा बसवेश्वर चौकातील समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेजवळ शिवा संघटना शाखा कारंजा व सामाजिक समता प्रबोधन मंचातर्फे समता नायक महात्मा बसवेश्वर यांची 892 वी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सामाजिक समता प्रबोधन मंचचे हंसराज शेंडे तर प्रमुख अतिथी माळी कर्म.सेवा मंडळाचे जिल्हाअध्यक्ष श्रीकृष्ण बोळे,मराठा सेवा संघाचे प्रवीण कानकीरड,बहुजन शिक्षक संघटनेचे अनिल डेरे, बिरसा क्रांतीदलचे राजेश मस्के, विदर्भ बुरुड समाज संघटनेचे विनायक पद्मगिरवार,परमेश्वर व्यवहारे, रमेश नाखले,प्रणिता दसरे,उमाली एकघरे,उज्वला गोरटे आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरानी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व हरार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.
कार्यक्रमाचे प्रस्तविक शिवा संघटनेचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष देवानंद बोन्ते यांनी केले.
बाळासाहेब डेरे,प्रणिता दसरे,रमेश नाखले,राजेश मस्के,प्रविण कानकिरड यांनी आपल्या मनोगतातून महत्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात हंसराज शेंडे म्हणाले की, जगातील लोकशाहीचे प्रणेते महात्मा बसवेश्वर यांचे विचार कसे क्रांतिकारी आहेत? व आज या विचारांची गरज का आहे? हे स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शिवा संघटणेचे देवानंद बोंते यांनी तर आभार सामाजिक समता प्रबोधन मंचाचे समन्वयक विजय भड यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुरुषोत्तम विभुते, गजानन एक्कलवार, विजय एक्कलवार,रवी कोष्टी, रितेश कोष्टी, रुपेश कोष्टी,
आदित्य होनराव,प्रणव विभूते,शिवा गाढवे,सारंग गोरटे,सागर टेवरे,नितिन कोष्टी,प्रदिप देशमुख,पांगरे यांनी अथक प्रयत्न केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....