वाशिम : श्रावण मासा निमित्ताने, वाशिम येथून जवळच असलेल्या निसर्गरम्य दरी डोंगरातील वनराईत असलेल्या काटा - कार्ली किन्ही राजा मार्गावरील श्रीक्षेत्र जोडगव्हाण येथील चौदाशे वर्षापूर्वीच्या श्रीक्षेत्र विमलेश्वर मंदिरामध्ये भोले भक्तांची मांदियाळी दिसून येत असते. तसे तर बाराही महिने ह्या संस्थान मध्ये स्त्री पुरुष भाविकांची गर्दीच असते. मात्र श्रावण मास, पुरुषोत्तम मास, महाशिवरात्री, दर सोमवार व शिवरात्रीला येथे कावड यात्रा, वारकरी दिंड्या, श्रीमद्भागवत कथा, श्री महाशिवपुराण कथा, किर्तन, प्रवचन भजन आणि अन्नदान सुरु असतात. येथे पश्चिम महाराष्ट्रातून आलेले पुजारी हभप नित्यानंद महाराज देशमुख हे अखंड सेवारत आहेत. पंचक्रोशीतील भाविकां कडून धार्मिक व आध्यात्मीक कार्यक्रमासह उपवास फराळ, चहापान आणि अन्नदान सुरु असते. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी येथे कारंजेकर मंडळी विदर्भ लोककलावंत संघटनेचे संजय कडोळे, प्रदिप वानखडे, गोलू पाटील लाहे आदी शिवभक्तांनी दर्शना करीता भेट दिली असता, शिवभक्तांनी श्रीक्षेत्र विमलेश्वर महादेव संस्थान जोडगव्हाण ते श्रीक्षेत्र गोंडेगाव महादेव संस्थान कावडयात्रा केल्याचे दिसून आहे. मंदिरावर हजारो भाविकांची मांदियाळी होती त्यावेळी दुसऱ्या सोमवार निमित्त आमखेडा येथील श्री विनोद विश्वनाथ जोगदंड यांचे कडून संपूर्ण दिवसभर साबुदाना उसळाचे फराळ आणि तोरणाळ्याचे मुरलीधर महाराज काटेकर यांचेकडून संपूर्ण दिवसभर चहापाणी व्यवस्था तर तोरणाळ्याचे देवचंद कास्टे यांचेकडून दर सोमवारी दूधाची सेवा सुरु असल्याचे हभप नित्यानंद महाराज देशमुख यांनी सांगितले. रात्री एकलासपूर आणि जोडगव्हाण येथील भजनी मंडळाच्या भजनाचा हरिजागर होणार असल्याचे कळविण्यात आले .