वाशिम : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ निवडणूक विषयक कामाचे संदर्भात आज २६ मार्च रोजी वाशिम येथील तहसिल कार्यालय सभागृहात बैठक घेण्यात आली.
या बैठकीस जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी व्हिसीद्वारे मार्गदर्शन केले आणि निवडणूक संदर्भात कामकाज करणारे पथक क्रंमाक १ ते १६ सर्व नोडल अधिकारी व तसेच त्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना पथक प्रमुखांनी निवडणूक संदर्भात टपाली मतपत्रिका ८५ वर्षावरील जेष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व निवडणूकीचे कामामध्ये कार्यरत असलेले अधिकारी / कर्मचारी संदर्भात विहीत कालावधीत कार्यवाही करणे, सिव्हिजील तक्रार विहीत कालावधीत तात्काळ निकाली काढणेबाबत, मिडीया व्यवस्थापन, मिडीया तक्रार व पेड न्युज
मॉनिटरिंग संदर्भात संकलित माहिती तयार करुन वरिष्ठांना तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच निवडणूक
संदर्भात जे अधिकारी/कर्मचारी यांनी निवडणूक कामामधून सुट देणे, अर्ज केले त्या अर्जावर नियमानुसार कार्यवाही करणे, मनुष्यबळ व्यवस्थापन यांना तात्काळ कार्यवाही
करणेबाबत तसेच सर्व पथकांनी सर्व नोडल अधिकारी व त्यांच्या अधिनस्त असलेले अधिकारी/कर्मचारी यांनी विविध परवानगी देणे, आचार संहिता कक्ष, तक्रार निर्वारण, मतदत कक्ष,
जनसंपर्क व वाहतुक कक्ष गाडयांना जीपीएस लावण्याची कार्यवाही करणे, गाडयांचा हिशोब ठेवणे इत्यादीबाबत आढावा घेतला. या सभेस सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सहाय्यक ही सभा निवडणूक निर्णय अधिकारी १४-यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघ ३४-वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदार संघ राजेंद्र जाधव यांच्या अध्यक्षेखाली घेण्यात आली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....