कारंजा : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी स्थानिक दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांना पत्राद्वारे, श्रीरामप्राण प्रतिष्ठा दिनानिमित्त, दि. 22 जानेवारी 2023 रोजी प्रति दिपावली साजरी करण्यासाठी शासनाने "आनंदाचा शिधा" देण्याबाबत,निवेदन देऊन स्थानिक वृत्तपत्रामध्ये बातम्यांचा सपाटा लावला होता.त्यावर अखेर निर्णय होऊन,दि.10 जानेवारी 2024 रोजी, मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री दालनात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.त्यामुळे लवकरच स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा किटमधून तेल, दाळ,रवा साखर आदी जिन्नसचे वाटप होणार आहे.दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी येत्या 22 जानेवारी रोजी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने गोरगरीबांना,रास्त धान्य दुकानातून धान्य,कपडे तसेच आनंदाचा शिधा दिला पाहीजे. आणि शासनाच्या जनधन योजनेतून अर्थसहाय्य करण्याचीही मागणी केली होती. हे विशेष.शासनाच्या या निर्णयामुळे गोरगरीबांच्या चेहर्यावर आनंदाचे हास्य खुलणार असल्यामुळे संजय कडोळे यांनी मुख्यमंत्र्याचे आभार मानले आहे.