आरमोरी -: आरमोरी येथील तात्यासाहेब जोतिबा फुले प्रतिष्ठान वडसा रोड येथे आरमोरी तालुका माळी समाज संघटना व तात्यासाहेब फुले बहुउद्देशीय संस्था आरमोरी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन भिमराव पात्रिकर सर जिल्हा सल्लागार गडचिरोली व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मधुकर ठाकरे अध्यक्ष तात्यासाहेब फुले बहुउद्देशीय संस्था आरमोरी, रणजित बनकर तालुका माळी समाज संघटना अध्यक्ष आरमोरी, अभिमन्यू निकुरे जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली ,भुजंगराव पात्रिकर,प्रतिभा नदरधने, सिंधुताई जेंगठे, भेंडारेताई यांच्या
उपस्थित पार पडला.
माळी समाज संघटना कडून जवाहर नवोदय विद्यालय शिष्यवृत्ती परीक्षा पास होऊन निवड झालेल्या विद्यार्थी अंचित पात्रिकर याचे व पात्रिकर परिवाराचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
भिमराव पात्रिकर सरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना,
सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यांना आणि महिलांना शिक्षण देणे, जातिव्यवस्थेचे निर्मूलन,
मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, पत्नी सावित्रीबाई यांना शिक्षिका बनवलं
समाजसुधारणा
खालच्या जातीतील लोकांना समान अधिकार मिळावेत म्हणून सत्यशोधक समाजाची स्थापना केली
महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय "महात्मा" (संस्कृत: "महान आत्मा", "पूज्य") पदवी प्रदान केली होती
महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.
'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.
'ब्राह्मणाचे कसब ' हा त्यांचा आणखी एक गाजलेला ग्रंथ होय ..यात त्यांनी बहुजन विरोधी रुढी परंपरा यांवर टीका केली आहे .
गुरुदास बोरुले,मंगलदास कोटरंगे, खुशाल गायधने, रवि बनकर, देवरावजी मोहुर्ले,सुधाकर निकेसर,व्यंकट कोटरंगे, लोमेश कोटरंगे, लोमेश कोटरंगे, बाउराव जेंगठे सचदेव मोहुर्ले, विठ्ठले सर,मिलिंद वाढई,चंदु मोहुर्ले, अजय वाडगुरे, रुपाली बनकर, मंजुषा बनकर, सुनिता बनकर, क्रांती बोरुले,नीलिमा गावतुरे,श्रध्दा कोटरंगे, अल्का कोटरंगे, साधना कोटरंगे, रंजना ठाकरे, अल्का पेटकुले,आरती लठ्ठे, वनिता तोरनकर,उपरिकर,आंबेकर मॅडम,
समाजबांधव व भगिनींनी उपस्थित राहून सहकार्य केले
कार्यक्रमाचे संचालन सुरेश वाडगुरे, तर बालकदास कोटरंगे आभार व्यक्त केले
आपल्या प्रतिक्रिया द्या....