श्री. किसनराव खोब्रागडे ज्युनिअर कॉलेज वैरागडचा विद्यार्थी ओम महेंद्र कुमरे याने बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तर व विभागीयस्तरावर उत्तम कामगिरी करीत राज्य स्तरावर धडक दिली.
ओम महेंद्र कुमरे याने नुकत्याच झालेल्या बॉक्सिंग या क्रीडा स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात आणि ५४ ते ५७ वजनगटात गडचिरोली येथे जिल्हास्तरावर गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली व चंद्रपूर येथे विभागीयस्तरावर भोसला सैनिकी विद्यालय नागपूरच्या खेळाडूंना सलग दोन फेरीत पराभूत करून अलिबाग जि. रायगड येथे होणाऱ्या स्पर्धेत धडक दिली आहे. सदर स्पर्धेसाठी क्रीडाशिक्षक प्रा. प्रकाश म्हशाखेत्री यांनी मार्गदर्शन केले.
वैरागड जवळील मोहटोला या आदिवासी ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील खेळाडूने बॉक्सिंग सारख्या शहरी क्रीडा प्रकारात सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीचे संस्थाध्यक्ष श्री. भाग्यवानजी खोब्रागडे, डॉ. सचिनभाऊ खोब्रागडे, प्राचार्य डॉ. विवेक हलमारे, प्रा. नरेश लाडे, प्रा. मनीष राऊत, प्रा. अमोल नैताम, प्रा. चंद्रशेखर बर्वे, प्रा. कु. चांदेवार, प्रा. सरकार व निखिल पाटील यांनी कौतुक व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.