कारंजा : विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात साजरी होत असताना कारंजा लाड येथे सुद्धा ही जयंती संपन्न करण्यात आली. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 134 व्या जयंतीनिमित्त व्हाईस ऑफ मीडिया फोरम जिल्हा वाशिम व मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारत जिल्हा वाशिम च्यावतीने, महामानव डॉ आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीतील अनुयायां करीता थंड पेय शरबत वाटप कार्यक्रम संपन्न करण्यात आला, या कार्यक्रमाला आयोजक मंडळी महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हचे संपादक विनोद कुमार तसेच मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष मोहंमद तवंगर यांनी आयोजन करून महिला पत्रकार उषाताई नाईक व सौ मोनाली विनोद गणवीर यांच्या हस्ते उद्घाटन करून शरबत वाटप करण्यात आले. कार्यक्रमा करीता गजानन टोम्पे यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्यांनी सुद्धा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता अथक प्रयत्न केले. कार्यक्रमांमध्ये सहभागी मंडळी अब्दुल जुबेर, फिरोज जट्टावाले, शेख हफिज, शेख बबलू, दिनकर सुरजुसे, गंगाधर सूरजुसे, निलेश सुरजुसे यांनी सुद्धा अथक प्रयत्न केले.
जगभरामध्ये साजरा होणारा उत्सव भीम जयंती उत्सव हा कारंजा शहरांमध्ये जल्लोषमय वातावरणात संपन्न झाला, आपण बघत आहात काही छायाचित्रे आणि व्हिडिओज..