मुल: मद्य प्राशन करून नशेतच वाहन चालविण्याच्या घटना अधिक घडतात. यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मुल पोलिसांच्या वतीने ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम हाती घेतली आहे करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून मद्यपी चालकांविरुद्ध पोलिसांची थंडावलेली मोहीम 1 जानेवरी पासून तीव्र करण्यात आलेली आहे. करोना संसर्गामुळे ब्रेथ अॅनालायझर वापण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र यंदा नविन वर्षा पासून पुन्हा ब्रेथ अॅनालायझरचा वापर सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवाल तर खबरदार असा इशाराच मुल वाहतूक पोलिसांनी मद्यपी चालकांना दिला आहे.
नवीन मोटार कायद्याची नुकतीच मुंबईसह महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यात आली असून वाढीव रकमेनुसार दंड आकारण्यात येत आहे. मद्य प्राशन करून नशेतच वाहन चालविण्याच्या घटना अधिक घडतात. यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीने ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम हाती घेतली जाते. मार्च २०२०पासून करोनाचा संसर्ग सुरू झाल्याने या मोहिमेला काहीसा ब्रेक लागला. विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी मद्यपी चालकांना तपासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रेथ अॅनालायझरवर बंदी घालण्यात आली. होती परंतू 1 जानेवरी पासून मुल पोलिसांनी मोहीम सुरू केल्याने मद्यपी चे धाबे दणाणले आहे आता पर्यंत मुल पोलिसांनी 9 मद्यपान करुन वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.