कारंजा : जस जस्या विधानसभा निवडणूका जवळ येऊ पहात आहेत.तस तसे राजकिय रंगमंचावर नव नविन अंक बघायला मिळत आहेत. यात महत्वाचे म्हणजे स्थानिक पक्षनेते निवडणूकी करीता फारसे उत्सुक नसल्याने आणि पक्षश्रेष्ठी जवळ त्यांचा हवा तसा दबदबा नसल्याचा लाभ घेऊन मुंबई सह यवतमाळ,घांटजी,दिग्रस इत्यादी वेगळ्या जिल्ह्यातील आणि वेग वेगळ्या मतदार संघातील रहिवाशी असणारे राजकिय नेते, कारंजा मानोरा येथील मतदारांचे कोणतेही सगेसोयरे नसतांना किंवा मतदार संघाशी आजपर्यंत यापूर्वी सुतराम संबंध नसतांना देखील,कारंजा मानोऱ्यातील मतदारांच्या जीवावर,आपली राजकिय पोळी शेकून घेण्याकरीता,कारंजा मानोरा मतदार संघातील काही किरकोळ राजकिय कार्यकर्त्यांना खरेदी करून व त्यांना खोटी आमिषं दाखवून,आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यासाठी बाहेर जिल्ह्यांतील ह्या व्यक्ती गोरगरीबांच्या समस्या व अडचणी सोडविण्याचा केवळ यांनाच कळवळा येत असल्याचा आव आणून,आपण खूप मोठे रुग्नसेवक,राजा हरिश्चंद्रा पेक्षाही जास्तच दानशूर आणि गोरगरीब व शेतकऱ्याचे सर्वात मोठे हितचिंतक असल्याचा आव आणत आहेत.त्याकरीता मतदार संघाच्या मुळ समस्याची कोणतीच जाण नसतांनाही,फक्त स्वप्रचारा करीता विविध मोर्चे, आंदोलने करीत आहेत.मात्र सुज्ञ मतदार अशा भ्रमाचा भोपळा ठरू पहाणाऱ्या बाहेरगावच्या मतलबी राजकिय नेत्याच्या भूलथापांना अजिबात बळी पडणार नाहीत.विशेष म्हणजे ही राजकीय नेते किंवा स्वयंघोषीत भावी आमदार मंडळी एकीकडे महाविकास आघाडीच्या पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मिळण्याकरीता सर्वस्व पणाला लावीत आहेत.तर दुसरीकडे स्वतःला आमदारकी मिळावी म्हणून कारंजा मानोरा मतदार संघातील भोळ्या भाबळ्या मतदारांना अक्षरशः संमोहित करून त्यांची फसवणूक करीत आहेत.मात्र कारंजा मानोरा मतदार संघातील मतदार जनता आपला कोण ? परका कोण ? यांना चांगलीच पारखून असून, यापुढे स्थानिक किंवा कारंजा मानोरा मतदार संघ कर्मभूमी असलेल्या चिरपरिचित व्यक्ती पैकीच एखाद्या व्यक्तीची भविष्यातील आमदार म्हणून निवड करणार आहे.मात्र कारंजा मानोरा मतदार संघाची आजपर्यंत कोणताच संबंध नसणाऱ्या, आजता गायत ज्यांचे नावही कधी ऐकले नव्हते.अशा कारंजा मानोरा येथील लोकांसाठी अनोळखी असणारे उमेद्वार निवडणूकीवर डोळा ठेवून,येथील दोन चार कार्यकर्त्याला हाताशी धरून,आमदार होण्याचे स्वप्न रंगवीत आहेत. मात्र आता अशा उमेद्वाराला कारंजा मानोरा मतदार संघातील सुज्ञ मतदार जनताच धडा शिकवून,त्यांची पार्सल, त्यांच्या मुळ गावी, परत केव्हाही न दिसण्यासाठी कायमची पाठविणार आहेत.असा मतदार संघातील मतदाराचा कौल असल्याचे समाजसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे.