वाशिम : जिल्ह्यातील रिसोड शहरात चालू वर्षाच्या तिन महिन्यापूर्वी दि. 21 मार्च 2024 च्या प्रातःकाळी 06:15 ला भूकंपाचे धक्के जाणवल्याची अलिकडील घटना ताजी असतांनाच पुनश्च एकदा बुधवार दि. 10 जुलै 2024 च्या सकाळी 07:15 च्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील वाशिमसह मानोरा, रिसोड,मालेगाव,कारंजा येथे क्षणभर अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी घरातील भांडी पडणे.पंखे हलणे,थरथरल्या होणे असा भास झाल्याचा नागरिकांना अनुभव वाटला.त्यामुळे काही नागरीक घराबाहेर पडल्याचे वृत्त आहे. याबाबत थोड्याच वेळात मराठवाडा येथील नांदेड येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे वृत्त मिळाले असून रिस्टर स्केलवर 4.5 एवढी तिव्रता असल्याची माहिती मिळालेली असून हिंगोली,परभणी, हिंगोली,नांदेड या भागात भूकंपाची जाण झाली. मात्र यामध्ये कोणतेच नुकसान झालेले नसून नागरिका मध्ये मात्र भितीचे वातावरण असून ते भयग्रस्त झाले असल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे