कारंजा [लाड ] -- जैनांचे 24 वे तिर्थंकर अहिंसेचे पुजारी भगवान महावीर यांचा जन्मोत्सव व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.11 रोजी शहर पोलिस स्टेशन कार्यालयामध्ये शांतता कमिटी बैठकीचे ,उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे साहेब व पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनोने साहेब ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.
ह्यावेळी भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त आयोजित सकाळच्या प्रभातफेरी व सायंकाळच्या शोभायात्रेला व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीला दरवर्षी निघणाऱ्या मार्गावरुन परवानगी मिळाली असून दोन्ही समितीच्या वतीने ह्याप्रसंगी शांततेत व सलोख्याच्या वातावरणात तसेच एकमेकांच्या सहकार्याने निवडणूका पार पाडल्या जाईल असे आश्वासन दिले.
तत्पुर्वी दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी मिरवणुका शांतता व सुव्यवस्था अबाधित राखुन पार पाडाव्यात असे आवाहन केले होते ह्यावेळी त्यांनी जैन समाजाचे अभिनंदन केले.
ह्यावेळी समितीचे मार्गदर्शक अॅड संदेश जिंतुरकर व प्रज्वल गुलालकरी , राजाभाऊ चव्हाण , नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष जुम्माभाई पप्पुवाले , जामा मस्जिदचे मौलाना अब्दुल मजीद , विलास राऊत ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना काही सुचना केल्या त्यावर दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी त्या अंमलात आणणार असल्याचे सांगितले.
ह्या सभेला समितीचे अध्यक्ष सतिश भेलांडे , दिलीपभाऊ उन्होंने , धनंजय भाऊ गहाणकरी , नितीन चढार ह्यांच्या सह पत्रकार मंडळी व दोन्ही समितीचे पदाधिकारी व शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. असे प्रसारमाध्यमाला एड संदेश जिंतुरकर कडून कळविण्यात आले आहे .