येथील पत्रकार राजकुमार वानखडे हे पंजाब मधील पटियाला येथील हरपाल तिवाना कला केंद्रात आयोजित कार्यक्रमात रेडिओ श्रोता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्कार हा रेडिओ श्रोता दिवस दि. 20ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे भूषण श्रीकांत आर जी फड, प्रकाश इंगोले तथा पटियाला आकाशवाणी केंद्राचे अधिकारी महेंद्र कुमार शर्मा,परशराम साहु गुरूजी, खंडवा आकाशवाणी चे उदघोषक पंकज लाड, बलवंत वर्मा, आनंद जोशी, ज्ञान भूषण शर्मा,बिजेद्र जयजान,रवि कुमार रावत,सह असंख्य रेडिओ श्रोता व आकाशवाणी पटियाला व आकाशवाणी सुरतगढ चे उदघोषक यांच्या उपस्थितीत राजकुमार वानखडे यांना रेडिओ श्रोता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातुन कमल किशोर भरतीया,सिध्दार्थ गोंडाणे, सुनील हिरूळकर, मुकेश कासलेकर,ॲड.दवणे,विजय सुरळकर,कुदंन जाधव, श्रीकृष्ण बाठे, सदानंद मुळे सह बहुसंख्येने रेडिओ श्रोता उपस्थित होते.राजकुमार वानखडे या पुरस्काराचे श्रेय सर्व पत्रकार व रेडीओ श्रोत्यांना तसेच अजय प्रभे,सागर वडतकार, सरीता देवी मनोहर, ज्योतीताई यादव, राजेश तेलगोटे, महेंद्र मुनेश्वर,संतोष इंगळे यांचे सह मुंबई आकाशवाणी केंद्राचे अधिकारी डॉ संतोष जाधव, प्रविण नागदिवे यांना देतात .