आरमोरी.
ज्या गावात जन्म झाला त्या गावात शैक्षणिक सुविधा नव्हत्या, पक्के रस्ते नव्हते,, समस्येचा डोंगर उभा असतानाही प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी दोन हात करून संघर्ष करत मदन मेश्राम यांनी शिक्षणाचे जाळे विणून मुलांना दर्जेदार शिक्षण दिले. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आणि कार्याने प्रभावित होऊन मेहनत, जिद्द ,चिकाटी, परिश्रम व संघर्षातून ते पुढे आले. समाजातील गोरगरिबाप्रति त्यांची तळमळ, नम्र स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची हचोटी आणि सामाजिक हित जोपासत कर्तव्यनिष्ठने अनेकांना मदत केली. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची उंची मोठी आहे. मदन मेश्राम यांना शासनाने दिलेला पुरस्कार हा खऱ्या अर्थाने आरमोरीकराची शान वाढविनारा आहे असे गौरोदगार अनेक मान्यवरांनी केले . निमित्त होते मदन मेश्राम यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे...
प्रेरणा शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाचे अध्यक्ष मदन मेश्राम यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन नुकताच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सन २०२३.२४ यावर्षीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्यमंत्र्याच्या हस्ते मुंबई येथे सन्मानित करण्यात आले त्यानिमित्ताने आरमोरी येथील मित्र परिवाराच्या वतीने रविवारी मदन मेश्राम यांचा नागरी सत्कार आरमोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन भवनात करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, शिक्षण महर्षी भाग्यवान खोब्रागडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कृष्णा गजबे , भंते राहुल बोधी, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ठवरे, सत्कारमूर्ती मदन मेश्राम, विमलताई मेश्राम, धर्मा बांबोळे , माजी प्राचार्य व्ही. जी. शेंडे, पि.के. सहारे, तुंबडे ,राजेंद्र मेश्राम ,वेणूताई ढवगाये, हरिदास सहारे, ॲड. प्रशांत मेश्राम, कल्पना ठवरे, विद्या चौधरी,पंकज खरवडे आधी उपस्थित होते.
. यावेळी मदन मेश्राम आणि त्यांच्या पत्नी विमल मेश्राम यांना भेटवस्तू साडीचोळी, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ, सम्राट अशोक सोशल फोरम व इतर सामाजिक संघटना व मित्र परिवाराच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला . यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मदन मेश्राम यांनी कठीण परिस्थितीत संघर्ष करून स्वकर्तृत्वाने व मेहनतीने पुढे येऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांचा थक्क करणारा प्रवासावर भाष्य केले..
सत्कार प्रसंगी बोलताना मदन मेश्राम यांनी कृतज्ञता व्यक्त करत आपल्या या प्रवासात अनेकांनी मदत केली .. लोकांचे सहकार्य आणि प्रेमामुळे आपण इथवर पोहोचलो. आणि सामाजिक, शैक्षणिक कार्य करता आले. असे सांगून त्यांनी आपल्या जीवनातील अनेक चढ उतार आणि अनुभव कथन केले.पुढील आयुष्य सुद्धा समाजासाठी खर्च करीन असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खिरेंद्र बांबोळे यांनी केले. संचालन अनिल ठवरे यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य अमरदीप मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला मदन मेश्राम यांचे चिरंजीव ॲड. प्रशांत मेश्राम व त्यांच्या परिवारातील सदस्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाचे पदाधिकारी व आरमोरी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....