कारंजा : दिवसेंदिवस विद्यार्थ्यांमध्ये अंमली व मादक पदार्थाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. अंमली व मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या अथवा जाऊ शकतील अशा वातावरणात राहणाऱ्या मुलावर लक्ष ठेवणे व त्याबद्दल शाळेमधील विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करून त्याबाबत जनजागृती करणे हा उद्देश समोर ठेवून प्रत्येक शाळेमध्ये प्रहारी क्लबची स्थापना करन्यात यावी,अशा सूचना शिक्षण विभागाने केलेल्या आहेत. या अनुषंगाने यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयात 15 जुलै रोजी शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहारी क्लबची स्थापना करण्यात आली.
विद्यालयात स्थापन केलेले प्रहारी क्लब मध्ये एकूण 21 सदस्यांचा सहभाग आहे. ज्यामध्ये प्रहरी क्लबचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड, सचिव आनिल हजारे तर सदस्य म्हणून राजेश शेंडेकर व गोपाल काकड या शिक्षकासोबत वर्ग आठवीतील विद्यार्थी रुद्र नवनाथ डुकरे, अमन राजु वासे,सूरज बालू बोकडे,सुजल निलेश भोयर, कार्तिक नानासाहेब वडेकर, वर्ग नववी मधून वंश हिम्मत आडोळे, दक्ष गजानन दिहाड़े, हरीश नितेश रीठे, सार्थक प्रशांत पाटील,भावेश गणेश येवले तर वर्ग दहा मधून प्रणय बाळू बोकडे,विष्णू गणेश इंगळे,तुषार गणेश बोनके, दर्शन विश्वनाथ ठाकरे, कृष्णा संजय कोपरकर व अभिषेक कैलास कापसे यांचा सदस्य म्हणून सहभाग आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी प्रहारी क्लब स्थापन करण्याचा उद्देश स्पष्ट करून,या प्रहरी क्लब द्वारे वर्षभर कोणकोणते जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत? याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व वर्ग 8,9 आनी 10 चे विद्यार्थी उपस्थित होते.