कारंजा : कारंजा तालुक्यातील माध्यमिक विज्ञान शिक्षकांची विज्ञान भारतीच्या उपक्रमा बाबत कार्यशाळा गुरुवार १७ नोव्हेम्बर २०२२रोजी एम.बी.आश्रम हायस्कूल कारंजा, येथे विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळाचे सचिव नरेश चाफेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.
सदर कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून एम.बी. आश्रम हायस्कूल कारंजाचे मुख्याध्यापक प्रकाश सरोदे तर उद्घाटक म्हणून कारंजा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी गौतम खंडारे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ आर.सी मुकवाने,जे.सी. हायस्कूलचे प्राचार्य उदय नांदगावकर तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळाचे सचिव नरेश चाफेकर कार्यकारणी सदस्य मनीषा घारे व गणेश जोशी उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविकात जे. सी. हायस्कूल कारंजाचे प्राचार्य उदय नादगांवकर यानी विज्ञान भारतीच्या उपक्रमाचे महत्त्व विशद केले. कार्यशाळेचे उद्घाटन कारंजा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गौतम खंडारे यांनी केले. आपल्या उद्घाटनिय भाषणात गौतम खंडारे यांनी विज्ञान शिक्षक म्हणजे शाळेचा कणा असतो तसेच तो सदैव उपक्रमशील असतो,असे गौरव उद्गगार विज्ञान शिक्षकाबाबत काढले. यानंतर डॉ. आर.सी. मुकवाने यांनी विज्ञान भारती व विज्ञान शिक्षक यामधील संबंध स्पष्ट केला.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विज्ञान भारतीय विदर्भ प्रदेश मंडळाचे सचिव नरेश चाफेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात विज्ञान भारतीचे प्रमुख चार उपक्रमाबद्दल माहिती दिली. विज्ञान संस्कार शिबिर, विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा, कुतूहल प्रदर्शन, मॉडेल मेकिंग वर्कशॉप या उपक्रमाबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन करून यामध्ये आपल्या शाळेचे विद्यार्थी कसे सहभागी करून घेता येईल? याबबतची सविस्तर माहिती दिली.
सदर कार्यशाळेत शाळेचे सूत्रसंचालन व आभार बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डीचे मुख्याध्यापक विजय भड यांनी मानले. या कार्यशाळेला कारंजा तालुक्यातील बहुसंख्य माध्यमिक शाळेतील विज्ञान शिक्षक उपस्थित होते. असे वृत्त मुख्याध्यापक विजय भड यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे दिले आहे.