आरमोरी -
दिनांक 14 /11 /2022 सोमवारला स्थानिक श्रीमती वत्सलाबाई वनमाळी येथील "बालक दिन" साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांची विविध वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या वेशभूषेची विषय - फुले, फळे, परीया,चॉकलेट,समाज सुधारक, क्रांतिकारक, विविध राज्यातील प्रांतातील वेशभूषा, उपयोगी वस्तू, प्राणी,इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ग्रेट पर्सनॅलिटी इत्यादी विषय ठेवण्यात आलेली होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक माननीय नितीन कासार सर तर प्रमुख पाहुणे तथा स्पर्धेची परीक्षक म्हणून प्रणालीताई गारोदे , अलकाताई बावनवाडे,अश्विनीताई गजापुरे तथा शाळेचे शिक्षक किरण मांडवकर यांनी स्थान भूषवले.
सर्वप्रथम माता सरस्वती, पंडित जवारलाल नेहरू तथा स्वर्गीय वत्सलाबाई वनमाळी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले व विविध वेशभूषा स्पर्धेला सुरुवात करण्यात आले.
वर्ग नर्सरी ते वर्ग 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये भाग घेतला होता व सर्व स्पर्धकांनी आपापली भूमिका योग्य रीतीने पार पाडली परीक्षण केल्यानंतर सर्व विजेता स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच सर्व विद्यार्थ्यांना बालक दिनाच्या निमित्ताने खाऊ म्हणून चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची संचालन नूतन शेंडे व सविता पानसे यांनी केले तर आभार प्रदर्शन पपीता बुल्ले नंदा लोणारे यांनी मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले कार्यक्रमाचे शेवट राष्ट्रवादी सांगता करण्यात आली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....