अकोला:-
देशाची ओळख प्रभू रामचंद्राच्या नावाने ओळखल्या जाते त्या साकेत धामाचे दर्शनासाठी जिल्ह्यातील ८३४ जेष्ठ नागरिक श्री जानकी वल्लाभो सहकार गौरव विशेष रेल्वे गाडीने क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांचे जयंती दिनानिमित्य सामाजिक समरसता सोबत हनुमान जयंती पर्वावर जात असलेले भाविक भाग्यवंत असून आमदार रणधीर सावरकर यांचे पुढाकाराने मुख्यमंत्री जेष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजनेंतर्गत विशेष रेल्वे गाडी जात असल्याचे आनंद होती असल्याचे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.
अकोला रेल्वे स्टेशन वरील फालत नं ३ येथून भारतीय गौरव तीर्थ योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या सामाज कल्याण विभागातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुढाकाराने अकोला जिल्ह्यातून विशेष रेल्वे गाडी आमदार रणधीर सावरकर यांचे पाठपुराव्याने अयोध्या धाम येथे रवाना प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आमदार वसंत खंडेलवाल होते तर या वेळी आमदार रणधीर सावरकर, कामगार आयुक्त सौ. मायाताई केदार, सहाय्यक आयुक्त डॉ. अनिताताई राठोड, विजय अग्रवाल, किशोर पाटील जयंत मसने, girish जोशी, माधव मानकर तहसीलदार सुरेश कावरे तलाठी माहोरे उपस्थित होते.
ग्रामीण आणी शहरातील ८३४ जेष्ठ नागरिकांना कोट्यावधी जनतेचे आराध्य दैवत व अनेक वर्षाचे संघर्षा नंतर पंतप्रधान मोदी यांचे पुढाकाराने विशाल मंदिर उभारणी अयोध्या येथे झाली त्याचे दर्शनासाठी सरकारच्या योजनेचा लाभ व सरकारचे वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन सरकार सर्वांचे असल्याचे कृतीने सिद्ध झाल्याचे प्रतिपादन आमदार सावेअरकर यांनी सांगून आंपण कर्तव्याचे भावनेतून ही रेल्वे सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले. हा पहिला जत्था असून जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरिकान यात्रा घडवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे या वेळी सांगितले या वेळी जय श्रीराम, जय गजानन , हर हर महादेव, भारतमाता की जय, वंदे मातरम चा जयघोशाणे रेल्वे स्टेशन दुमदुमले. या रेल्वेमध्ये पिण्याचे पाण्यापासून भोजनाची व्यवस्था असून १३ डब्यांची गाडी आहे डॉ. ची व्यवस्था असून भाजपा तर्फे सुद्धा औषधे व डॉक्टरांची टीम सोबत पाठविण्यात आली. या मध्ये रामदरबार दर्शन, संकीर्तन ढोल ताशे तुतारी वाजंत्री पुष्प वृष्टी करून यात्रेकरूंचे स्वागत भाजपा तर्फे करण्यात आले. या वेळी अंबादास उमाळे, देवाशिष काकड, करण शाहू, अश्विन शुक्ला, पावन महल्ले, संदीप गावंडे, संजय जोशी, दिलीप मिश्र, राजेंद्र giri, उमेश श्रीवास, विपूल घोगले, किशोर कुचके, हेमंत शर्मा विशाल गमे, संदीप गावंडे, देवेंद्र देवर, अमोल साबळे, हर्शल गोंडचवर, मधुकर पाटकर, राजेश ठाकरे, अनिल गावंडे, अरविंद शुक्ला, संतोष डोंगरे, , अंकुश इंगळे, वैभव माहोरे, विठ्ठल चतरकर, धुर्व खुणे, जितेंद्र देशमुख, आनंद बलोडे, नितीन राऊत, नितीन लांडे, संजय गोट्फोडे संतोष पांडे, मोहन पारधी, गौरव मिर्जामले, गिरीश छान्गणी बंडू चौधरी, घनशाम भिसे, वैकुंठ ढोरे,उज्वल बामणेत आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न घेतले. या वेळी प्रभू रामचंद्राचे प्रतिमा व चात्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले, भरत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....