ब्रह्मपुरी /प्रतिनिधी:- मूर्ती लहान व कीर्ती महान असे कार्य गारर्गी अजय दोनाडकर ने केले आहे. वाढदिवस म्हटलं की मंत्री, आमदार ,खासदार व विविध पक्षाचे पदाधिकारी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, रुग्णांना फळ वाटप करतात परंतु ब्रह्मपुरी येथील तिसऱ्या वर्गात शिकणारी कु.गारर्गी अजय दोनाडकर हिचे चक्क ग्रामीण रुग्णालयात ब्रम्हपुरी येथील कुपोषित बालके व इतर रुग्णांना आपल्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप व पाण्याची बाटल वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला तिच्या या अभूतपूर्व उपक्रमास सर्वत्र कौतुक केले जात आहे.
रुग्णांना फळवाटप करताना वैद्यकीय अधिकारी डाँ. खंडाळे, डाँ. शेख, डाँ. श्रीकांत कांबळी,लीना ठाकरे, परिचारिका,तालुका पत्रकार संघाचे सचिव गोवर्धन दोनाडकर,आई-सौ अश्विनी दोनाडकर,वडील-अजय दोनाडकर,सौ.संगीता दोनाडकर,गोजीरी दोनाडकर, स्पंदन दोनाडकर,जानकी दोनाडकर, व अन्य नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते.