वाशिम : वीर शिव छत्रपती संघटना एस.आर.एन.फिल्म प्रॉडक्शन व न्यूज 24 यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 2025 चा विदर्भ गौरव पुरस्कार, व्हॉइस ऑफ मीडिया महिला विंगच्या राज्य सहसचिव श्रीमती लक्ष्मीताई वाडेकर यांना त्यांच्या पत्रकारीता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन,वीर शिव छत्रपती संघटना आणि एस.आर.एन.फिल्म्स प्रॉडक्शन व न्यूज 24 यांनी,लक्ष्मीताई वाडेकर यांना कविवर्य सुरेश भट्ट सभागृह नागपूर येथे, "विदर्भ गौरव" पुरस्कार प्रदान करीत त्यांचा सन्मान केला,त्यांच्या या "विदर्भ गौरव" पुरस्कारामुळे बुलढाणा जिल्हा व खामगाव तालुक्याच्या पत्रकारीता क्षेत्रात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. लक्ष्मीताई वाडेकर ह्या वाशिम, अकोला, बुलढाणा जिल्ह्यात प्रसिद्ध झुंजार महिला पत्रकार म्हणून ओळखल्या जातात.त्यांना अगोदर सुद्धा मॉ जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते,
त्यांनी समाजाप्रती आणि महिलांविषयी धोरण आणि आणि समाजातील अंधश्रद्धा यांच्यावर सडेतोड पत्रकारितेच्या माध्यमातून,लेखन करून समाजामध्ये महिला पत्रकार म्हणून त्यांनी ख्याती मिळवली आहे . व याच कार्याची दखल घेऊन त्यांना "विदर्भ गौरव" पुरस्काराने पुन्हा एकदा सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या सन्मानामुळे त्यांचे संपूर्ण राज्यातील पत्रकार व मित्रमंडळी कडून सर्वत्र कौतुक होत असून
व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा वाशिमचे ज्येष्ठ मार्गदर्शक संजय कडोळे, पदाधिकारी गणेश पाटील लहाने, युवा क्रांति समाचार संपादक गुलाब ठाकरे, विजय खंडार, लोमेश पाटील चौधरी, उमेश अनासाने आदींनी अभिनंदन केले असून महिला विंगच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचेअभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.