वरोरा तालुक्यातील चिकणी येथील अल्पभूधारक शेतकरी सुरेश दामाजी झाडे यांच्याकडे .90आर इतकी अल्प जमीन असून या शेतीवर कारले ,दोडके वांगी ,चवळी शेंगा आणि भेंडी ,टमाटर,अशा अनेक प्रकारचे भाजीपाल्याची लागवड या शेतकऱ्यांनी केली, मात्र काल दिनांक 18 जुलै रोजी झालेल्या पावसामुळे यांच्या शेतीत लागवड केलेल्या फळझाडाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे
चिकणी या गावातील रहिवासी सुरेश दामाजी झाडे ,रमेश दामाजी झाडे,अमोल मोरेश्वर डाखोरे हे तीनही शेतकरी अल्पभूधारक असून या शेतीवर ते भाजीपाल्याची लागवड करीत आपली उपजीविका करत आहे,काल रात्रीच्या पावसाने शेतातील संपूर्ण झाडे, रोपे वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले असून शासनाने पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी हतबल झालेले शेतकरी करीत आहे,