वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ.झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना सन २०२३-२४ या वर्षात राबविण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील अनुदानासाठी इच्छुक पात्र मदरसा चालक / संस्थांकडून ३० जुन २०२३ पर्यत नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय,वाशिम येथे कार्यालयीन वेळेत आपले परिपूर्ण प्रस्ताव मागविले आहे.
प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे / प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.पूर्ण भरलेला अर्ज,
प्रतिज्ञापत्र (स्वयंसाक्षांकित),नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत,पी आ कार्ड / गाव नमुना सातबारा,उतारा / भाडे पावती/ दानपत्र /वक्फनामा,२ सदस्यांची यादी,ट्रस्ट डीडची सत्यप्रत,
धर्मादाय आयुक्ताकडून प्राप्त अनुसूची किंवा फेरफार अहवालाची प्रत,
वार्षिक अहवाल ( लगतच्या मागील चारपैकी 3 वर्षाचे )अंदाजपत्रक (बांधकामाकरीता मागणी केली असल्यास),पटसंख्येचा दाखला वय ६ ते १२ वयोगटातील विद्यार्थी संख्या, वय १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थी संख्या,शिक्षकांची संख्या व मानधन -
डीएड आणि बीएड शिक्षकांची संख्या,आगावू पावती,दरपत्रकाची प्रत,इमारतीचे छायाचित्र,SPQEM योजनेचा लाभ घेतला आहे किंवा नाही,मागणीची एकूण रक्कम व सुविधांचे स्वरुप,या अगोदर घेतलेल्या अनुदानाचा तपशील,उपयोगिता प्रमाणपत्रे आदी.कागदपत्रे सोबत जोडावी.
आपल्या प्रतिक्रिया द्या....