कारंजा(जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे.) : गेल्या उन्हाळ्यात अल निनोची भिती दाखवीत,अनेक भविष्यवेत्त्यांनी दुष्काळाची भिती व्यक्त करून पावसाळी अंदाज व्यक्त केले होते.परंतु परमेश्वर कृपेने निसर्गाने कारंजा तालुक्याला तारले असून गेल्या दिड दोन महिन्याचे पाऊसमान चांगले राहिल्याने येथील बळीराजाची पिके सद्यस्थितीत सुस्थितीत असून, आता बहरत चाललेल्या पिकांकरीता पुढे पाऊसाची नितांत आवश्यकता आहे.मात्र सप्टेंबर महिन्यात अल निनोचा प्रभाव जास्त असणार असल्याचे संकेत मिळत असल्याने हवा तेवढा पाऊस होणार नाही असेच दिसून येत आहे. परंतु असे जरी असले तरीही वाशीम जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत कारंजा तालुक्यात मात्र आजतागायत सद्यस्थितीतील पाऊसमान बर्यापैकी राहिलेले असल्यामुळे कारंजा तालुक्यातील सर्व जलाशये (धरण) आणि पाझर तलाव मात्र 100 % तुडूंब भरलेली आहेत.कारंजा पंचक्रोशितून अनेक छोट्या मोठ्या नद्या वहात असतांना, कारंजा तालुक्या कडून शेजारील जिल्ह्यातील शेत जमिनी सुजलाम् सुफलाम् करण्यासोबतच इतर जिल्ह्यातील मानवप्राणी आणि शेतजमिनीचीच तहान भागविल्या जात असते.
हेही एक कटूसत्यच आहे.कारंजा तालुक्यात उगम पावणाऱ्या उमा नदीचे पाणी अकोला जिल्ह्याच्या मुर्तिजापूर तालुक्यात पिण्याकरीता आणि सिंचना करीता वापरले जाते.तर बेंबळा नदीचे पाणी अमरावती वर्धा जिल्ह्यात जाते.कारंजा परिसरातून वाहत असलेल्या अडाण नदीवरील पिंप्री फॉरेस्ट येथील अडाण धरणाचे पाणी सुद्धा सिंचना करीता यवतमाळ जिल्ह्याला सिंचना करीता मिळते.या अडाण धरणावरच आज रोजी कारंजेकरांची तहाण भागविण्याकरिता पिण्याच्या पाण्याकरीता कारंजा शहरातील नागरिकांचे जीवन पूर्णतः अवलंबून आहे.आणि त्यामुळे अल निनोच्या दुष्काळाचे संकट लक्षात घेऊन आज रोजीच कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान भाजपा आमदार राजेंद्रजी पाटणी यांनी, संभाव्य दुष्काळाचे संकट लक्षात घेऊन,या मानवी जीवनाच्या महत्वपूर्ण पाणी समस्येकडे आपले संपूर्ण लक्ष्य वेधून, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचेकडून,पिंप्री फॉरेस्ट येथील अडाण धरणाचे पिण्याचे पाणी कारंजेकर नागरिकांकरीता आरक्षित करुन घेण्याची मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे,कारंजा येथील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक तथा महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केली असून,कारंजा तालुक्यातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते मंडळीनी सुद्धा भाविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या ह्या महत्वपूर्ण लक्ष्यवेधी प्रश्नाकडे आपले लक्ष्य वेधण्याची गरज असल्याचे सुचवले आहे.