कारंजा (लाड) : भारतीय सुरक्षा दक्षता परिषद नई दिल्ली एस.आय.एस.इंडिया (लि.) व स्त्री शक्ती मंच संघटना कारंजा (लाड) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळाव्यात नेर येथील सुरक्षा रक्षक, सुपरवायझर पदासाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली.
स्त्री शक्ती मंच संघटनेच्या राज्य अध्यक्षा सौ शारदा अतुल भुयार मेळाव्याचे आयोजन केले. एस आय एस अधिकारी नागेश भोजने सर यांनी मुलांची फिटनेस चाचणी घेतली. त्यामधून निवड झालेल्या युवकांना पुणे येथे ट्रेनिंग साठी एक महिन्याकरिता पाठवण्यात आले.ट्रेनिंग होताच त्यांना निवड झालेल्या गावामध्ये रोजगार देण्यात येईल .त्यांचा रोजगार सुरू होईल.
स्त्री शक्ती मंच संघटनेच्या सौ शारदा अतुल भुयार यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक तालुक्यात,जिल्ह्यांत एक हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
नेर येथे शिवाजी महाराज क्रीडा संकुल नेर येथे सुरक्षारक्षक, सुपरवायझर पदासाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली . त्यासाठी नेर येथील सौ रेणुका जैस्वाल यांनी यशस्वी नियोजन केले.सौ लता काळे स्त्री शक्ती मंच सदस्य , अतुल भुयार सर यांनी सहकार्य केले.