कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : "चार लोकं जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा मतभिन्नता निर्माण होत असते पण संस्था जेंव्हा संकटात सापडते तेंव्हा युधिष्ठिराने महाभारतात सांगितलेल्या "वयंम पंचाधिकम शतम" या उक्तीप्रमाणे सर्वांनी वागायला पाहिजे." असे आवाहन प्रा.विजय कुळकर्णी यांनी केले.सोमवार दि. 31 जुलै रोजी आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते.सेवा निवृती निमित्त स्थानिक के.एन.कॉलेज मध्ये निरोप समारंभ पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय कोडापे हे होते.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे माजी सचिव व दानदाते विमलजी गोयनका यांचे प्रतिनिधी म्हणून संस्थेचे आजीव सदस्य शाम शर्मा,संस्थेचे आजीव सदस्य प्रा. राहुल महाजन,शिक्षक प्रतिनिधी प्रा.डॉ. दीप्ती दाणी,सौ.मीनाक्षी कुळकर्णी,प्रा.डॉ.सुभाष गढीकर आदी उपस्थित होते.यावेळी सर्वांनी प्रा.कुळकर्णी यांनी महाविद्यालयाला जी सेवा दिली त्याबद्दल तसेच त्यांच्या शिकवण्याच्या हतोटी बद्दल, त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल गौरवोद्गार काढले.या प्रसंगी प्रा. डॉ.सुभाष गढीकर,प्रा.डॉ.प्रदीप येवले,प्रा.डॉ.दीप्ती दाणी, प्रा.अतुल महाले,श्री. शाम शर्मा, प्रा. ए. एस. शेख,प्रा.प्रकाश जंजाळ,प्रा.प्रकाश पवार,प्रा.डॉ. सुनील राठोड,प्रा.प्रशांत शिरसाट, सौ.मीनाक्षी कुळकर्णी,प्रज्वल गुलालकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.प्राचार्य डॉ.विनय कोडापे यांनी आपल्या भाषणातून कुळकर्णी सरांच्या शिकवण्याचे, त्यांच्या हस्ताक्षराचे,त्यांच्या सांस्कृतिक कार्याचे कौतुक केले.यावेळी त्यांनी संस्थेचे सचिव पवनजी माहेश्र्वरी यांनी पाठविलेल्या संदेशाचे वाचन केले.महाविद्यालायाच्या वतीने कुळकर्णी यांचा शाल,श्रीफळ, व भेटवस्तू देऊन व सौ.कुळकर्णी यांना साडीचोळी व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी गोयनका यांच्यातर्फे शाल व श्रीफळ तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीतील सदस्य डॉ.अजय कांत,विराज घुडे यांच्यातर्फे सुद्धा भेट वस्तू देवून सन्मान करण्यात आला.33 वर्ष 18 दिवस प्रा. कुळकर्णी यांनी महाविद्यालयास सेवा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपाली तायडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. ओंकार पवार यांनी केले.