आरमोरी :- नेहमी क्रिडा, आरोग्य, सामाजिक, कला व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या युवारंग संघटने तर्फे मागील ५ वर्षांपासून निशुल्क समर कॅम्प चे आयोजन केले जात आहे यावर्षी सुद्धा दि.१२ मे २०२४ पासुन ते अंतिम प्रशिक्षणापर्यंत रोज सकाळी ६:०० ते ८:०० वाजता पर्यंत स्वामी विवेकानंद विद्यालय, आरमोरी होणार असुन सदर समर कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांना , क्रीडा क्षेत्रातील कराटे ,फुटबॉल, रग्बी, कबडी, खो-खो ,क्रिकेट योगा,यासोबतच डान्स ,चित्रकला, वन्यजीव संरक्षण,आयुर्वेद, शेती,पत्रकारिता , वाहतूक नियमांची जनजागृती, शैक्षणिक सहल याबद्दल प्रशिक्षण व माहिती दिली जाणार आहे तरी या युवारंग निशुल्क समर कॅम्प मध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे सदर समर कॅम्प मध्ये सहभाग घेण्यासाठी समर कॅम्प चे संयोजक रोहित बावनकर ,लीलाधर मेश्राम,राहुल जुआरे , मनोज गेडाम,चारुदत्त राऊत, प्रिन्स सोमनकार ,सुमित खेडकर,अंकित बन्सोड, पंकज इंदूरकर, शुभम वैरागडे, गोपाल नारनवरे,श्रीराम ठाकरे, यांच्याशी संपर्क करावे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....