परिसरात १० जून रोजी रमेश सुपाजी निंबोकार (४९) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. प्रारंभी चान्नी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय तपासणीनंतर हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर १२ जून रोजी रात्री दोन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात संतोष ढोले यास अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी वैभव सहदेव पंजई (रा. विवरा) हा अद्याप फरार आहे. अटकेतील आरोपी संतोष ढोले याच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात हृदयरोगासंदर्भात उपचार सुरू असून, तो पोलिसांच्या निगराणीखाली आहे. न्यायालयाने त्याची तब्येत सुधारल्यावर पोलिस कोठडीत घेण्याचे आदेश दिले आहेत.. १० जून रोजी सायंकाळी पावणेचारच्या सुमारास सोपीनाथ नगरजवळील लिंबाच्या झाडाखाली रमेश निंबोकार बसले असताना संतोष ढोले व वैभव पजई या दोघांनी त्यांच्याकडे दारूची मागणी केली. रमेश यांनी नकार दिल्यामुळे रागाच्या भरात दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी व लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्यामुळे रमेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतकाचे बंधू सुरेश सुपाजी निंबोकार यांच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र लांडे करीत आहेत.