वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमार्फत सन 1954-55 पासून वृद्ध साहित्यिक कलाकार मानधन योजना राबविल्या जात असून,सदर योजनेच्या लाभाकरीता,पंचायत समिती कार्यालयामार्फतच अर्ज स्विकारले जातात.शिवाय पंचायत समिती कार्यालया मध्येच,मानधन लाभार्थी वृद्ध कलाकार हे त्यांचे हयात असल्या बाबतचे जीवन प्रमाणपत्र,पासपोर्ट फोटो,आधारकार्ड,बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर सहा महिन्यांनी देत असतात.व पंचायत समितीमध्ये हयात प्रमाण स्विकारून पुढे जिल्हा परिषद आणि त्यांचे मार्फतच सांस्कृतिक कार्य संचालनालया कडे मुंबईला पाठवीले जातात.त्यामुळे पंचायत समिती कार्यालयात तालुक्यातील 1954-55 नंतरच्या सर्व हयात मानधन लाभार्थी कलाकार यांच्या माहितीचे रजिस्टर (रेकॉर्ड) अद्यावत असला पाहिजे.तसेच कोणत्या वर्षी कोणत्या कलावंताना मानधन मंजूर झाले. कोणत्या वर्षी कोणत्या कलावंताचे हयात प्रमाणपत्र मिळाले.कोणाचे मिळाले नाही. कोणते कलाकार मय्यत झाले यांची माहिती व हयात प्रमाणपत्र घेतांना त्या लाभार्थी कलावंताच्या स्वाक्षरीचे रजिस्टर पंचायत समितीने ठेवले पाहिजे.कारण हयात प्रमाणपत्र देऊनही कलावंताची नावे त्रुटीच्या यादीमध्ये कशी काय गेली ? अशी विचारणा आज रोजी लोककलावंताकडून होत आहे. तसेच पंचायत समिती कडे सध्या उपलब्ध असलेली ही यादी जर त्रुटी ची आहे तर ज्यांच्या हयात प्रमाणपत्रा बाबत कोणतीच त्रुटी नाही. अशा लाभार्थी कलावंताची अद्यावत यादी लाभार्थी कलाकाराला का दाखवील्या जात नाही ? असा प्रश्न सुद्धा कलावंताना पडला आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या प्रत्येक मानधन लाभार्थी कलावंतांच्या संपूर्ण माहितीचे लाभार्थ्याच्या स्वाक्षरीसह अद्यावत रजिस्टर, राज्यातील प्रत्येक पंचायत समितीसह जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागाने उपलब्ध करून देण्याची मागणी विदर्भ लोककलावंत संघटना वाशिम यांचेकडून,राज्याच्या संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.