ब्रम्हपुरी ही शैक्षणिक नगरी असल्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यातील विध्यार्थी शिक्षणासाठी येतात यामुळे
अनेक धनिकांनी येथे इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळा व कॉलेजेस सुरू केल्या आहेत आणि सर्व आपल्या सर्व शक्तीनूसार चांगल्या सुविधा देत आहेत तरी सुद्धा आर्थिक बाजू सर्वसामान्य असतांना स्व श्रावणजी बगमारे महाजन चांदली यांच्या प्रेरणादायी प्रोत्साहन मुळे त्यांचे चिरंजीव प्रा प्रकाश बगमारे यांनी श्री श्रावनजी बगमारे शिक्षण संस्था ब्रम्हपुरी व श्री श्रावनजी बगमारे वाचनालय चांदली येथे स्थापन करून आज संस्थेद्वारे डॉ पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महाविद्यालय 2003 मध्ये व डॉ पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट 2005 मध्ये सुरू केले .एवढेच नव्हे तर2002 मध्ये डॉ पंजाबराव देशमुख नागरी सह पतसंस्थेचे रोपटे लावले व अनेक व्यापारी व्यावसायिकांना आर्थिक सहकार्य केले आहे .एवढे सेवाभावी उपक्रम सुरू करून चालविण्याची प्रेरणा स्व श्रावनजी बगमारे यांचे द्वारे प्रा प्रकाश बगमारे यांना दिल्यामुळे आजही स्व श्रावनजी यांचे विचार समाजास प्रेरणादायी आहेत असे भावपूर्ण मनोगत चिमूर गडचिरोली क्षेत्राचे लोकप्रिय खा अशोकजी नेते यांनी व्यक्त केले व स्व श्रावनजी बगमारे यांना 4 डिसें 22 रवीवारला ब्रह्मपुरी येथें त्यांच्या स्मृतिदिन प्रसंगी मनोगत व्यक्त केले .यानिमित्ताने संस्थेद्वारे खा अशोकजी नेते यांचा संस्थेच्या वतीने स्व उमाबाई बगमारे स्मृतीपित्यर्थ स्व उमाबाई बगमारे स्मृती मानवसेवा पुरस्कार व शाल श्रीफळ देऊन संस्थाध्यक्ष प्रा प्रकाश बगमारे,संस्था उपाध्यक्ष तथा डॉ पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट च्या प्राचार्या मनीषा ताई बगमारे, संस्था सदस्य शंतनू बगमारे व प्रा दिवाकर पिलारे,मनोज भूपाल, प्रा डॉ अशोक सालोडकर,प्रा रमेश गिरी,दिनकर फिटिंग,नागोजी कार, प्रकाश जगनकर,प्रकाश तोंडरे, सुरेश बनपूरकर व अन्य उपस्थित होते