आरमोरी येथिल सामजिक कार्यकर्ते तसेच वृक्षप्रेमी सेवानिृत्तीत प्रा.डॉ. के. टी. किरणापुरे यांची सून प्रतिक्षा वृषाल किरणापुरे हिची सोनी टीव्हीवर प्रसारित होत असलेल्या कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमात पहिल्या दहा मध्ये निवड झाली असुन येत्या शुक्रवार ला त्या बिग बी महानायक अमिताभ बच्चन सोबत दिसणार आहेत.
सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या कोण बनेगा करोडपतीचे नित्यनेमाने आपल्या परिवारासोबत एपिसोड बघून विचारलेल्या प्रश्नांची तात्काळ उत्तरे देवून किरणापुरे परिवारातील सदस्यांनी आतापर्यंत केबीसी द्वारे अनेक बक्षीस मिळवले आहेत. अभियंता वृशाल के किरणापुरे यांनी कोन बनेगा करोडपती च्या हॉटसीटवर परिवारातील सदस्यांनी एकदा तरी बसावे हे स्वप्न बघीतले होते हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रतिक्षा हिने जिद्द, चिकाटी व मेहनतिच्या माध्यमातुन के. बी. सि. मध्ये दहा मध्ये जागा मिळवली आहे.
प्रतिक्षा किरणापुरे हिच्या निवडीबद्दल सर्व आरमोरी तालुक्यातील जनते तर्फे तसेच आप्तस्वकीय, नातेवाकांकडून व मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमात दहा मधुन सुद्धा अती जलद गतीने विचारेल्या प्रश्नाची उत्तरे देवून प्रथम क्रमांक प्राप्त करुन हॉट सीटवर विराजमान होतील अश्या शुभेच्छा त्यांना देण्यात आले आहे.
प्रतिक्षा वृषाल किरणापुरे हीने आपल्या निवडीचे श्रेय प्रा. डॉ. के. टी. किरणापुरे, रजनी के. किरणापुरे, पती वृशाल किरणापूरे, हिमानी किरणापुरे व आई वडील, सुभाष भांडारकर, सुनीता भांडारकर ह्यांना दिले आहे.