कारंजा : सद्याच्या सरकारने समाजातील वाढती बेरोजगारी संपविण्याकरीता सरकारी नोकरी वाढविण्यासाठी पाऊले उचलण्याची आणि सरकारी निमसरकारी उद्योग धंद्यांना चालना देण्याची मुलभूत गरज असतांना त्यांनी सरकारी नोकर भरती बंद करून,सर्व शासकीय निमशासकीय संस्था,जगामध्ये नंबर वन असणारी केन्द्रसरकारची रेल्वे,बँका व तत्सम संस्थाचे खाजगीकरण करून,तसेच तळागाळातील ग्रामिण भागाच्या वस्त्या तांड्यांवरील शेतकरी शेतमजूरांची मुले ज्या शाळेमधून आजतागायत १००% मोफत शिक्षण घेत होती.अशा राज्यसरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदाच्या आणि महानगर पालिका नगर पालिकाच्या शाळा व विद्यालये खाजगी संस्थाना देण्याचा शासन आदेश काढला. त्यामुळे भविष्यात गोरगरीब मजूरांची मुले शाळाच शिकू शकणार नाहीत आणि शिक्षक भरती सुद्धा होणार नाही.तसेच मंत्रालयातील सचिव ते तहसिलदार पर्यंतची पदे खाजगी संस्थाद्वारे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा डाव आखला. आणि युवकांचे खच्चीकरण केले. तसेच महाराष्ट्रातील होऊ घातलेले उद्योग धंदे गुजरातला पळविले.आपल्या जिल्ह्यातही येथील पर्यावरण,जागा, हवा, पाणी चांगले असतांना तसेच या भागात मोठ्या उद्योगाची गरज असतांना एकही उद्योग कारखाना सुरु केला नाही. येथील मजूर, कामगाराच्या हाताला काम नाही त्यामुळे त्यांना ऊसतोडी सारख्या कामाकरीता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जावे लागते.त्यामुळे समाजातील सुशिक्षीत युवा बेरोजगारामध्ये आणि वस्त्या- तांड्यावरील मजूर कामगारामध्ये संतापाची लाट असून निवडणूकीमध्ये मतदान करतांना नैराश्याची भावना आहे.परंतु मतदार नागरीकांनी निराश न होता,येणाऱ्या शुक्रवारी दि. 26 एप्रिल 2024 रोजी सत्ताधारी पक्षाला धडा शिकविण्याकरीता,तुमच्या विश्वासातील कर्तव्यतत्पर असलेल्या महाविकास इंडिया आघाडीचे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय उमेद्वार संजयभाऊ देशमुख यांच्या मशाल या चिन्हा समोरील बटण दाबून त्यांनाच बहुमताने विजयी करावे. त्यांच्या विजयाने आपल्या मतदार संघातील परिस्थितीत निश्चितच सुधारणा होऊन आकांक्षित जिल्ह्याच्या यादी मधून आपला जिल्हा बाहेर पडून जिल्हयाचा विकास होईल.असे आवाहन काँग्रेस कार्यकर्ते अब्दुल राजिक शेख यांनी केले आहे.