कारंजा [लाड] : स्थानिक श्री धर्मराज एज्युकेशन सोसायटी कारंजा द्वारा संचालित केशव गुरुकुल कौन्व्हेंट,येथील श्री अच्चुत महाराज सभागृह हटोटीपूरा कारंजामध्ये,स्व. मोहनराव मुरकुटे यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रध्दांजलीचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी या निमित्ताने महिला मंडळीची भजन सादरीकरण स्वरांजली कार्यक्रम घेण्यात आला.सदर्हू कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष रविंद्रसावजी चवरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गरड , विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे,गुणवंत पाटील माजी नगराध्यक्षा ऊर्मिलाताई इंगोले, युवा कार्यकर्ते संदेश जिंतूरकर,पत्रकार आरीफ पोपटे, अ भा नाट्य परिषदेचे उज्वल देशमुख,नाट्य परिषदेचे नंदकिशोर कव्हळकर,आशाताई कव्हळकर,संस्थाध्यक्षा राधाताई मुरकुटे हे व्यासपिठावर उपस्थित होते.याप्रसंगी सर्वप्रथम दीप प्रज्वलन व स्व.मोहनरावजी मुरकुटे,संत अच्युत महाराज तथा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात येऊन संस्थाध्यक्षा राधाताई मुरकुटे तथा संचालिका सौ मोनाली पार्थ मुरकुटे यांचे हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.प्रार्थनेनंतर वंदनिय संत अच्युत महाराजांची सामुहिक जपमाळ घेण्यात आली.याप्रसंगी उपस्थीत सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कारंजा नगरीमधून, दहा ते पंधरा महिलांचे एकूण दहा गट, [दिडशे महिला] भजन सादरीकरण कार्यक्रमात सहभागी झाले होते.यावेळी तबला वादन इहिरे सर यांनी तर हार्मोनियम वादन सुपलकर यांनी केले. भजनाच्या प्रारंभी कु.अग्रिमा पार्थ मुरकुटे हीने आपल्या स्वर्गीय आजोबांना भजनमधून श्रध्दांजली समर्पीत केली.

त्यानंतर महिला मंडळीच्या भजनाचे सादरीकरण घेण्यात आले.सर्व भजन सादरीकरण करणा-या महिलांना शाळेतर्फे प्रमाणपत्र,सुंदरशी भेट व अल्पोपहार पाकीट देण्यात आले. याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी अश्विन जगताप यांचा सपत्निक व वृत्तसंकलन , चित्रीकरणाकरीता आलेल्या सौ मोनाली गणवीर व विनोद गणवीर या दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक संस्थाध्यक्षा राधाताई मुरकुटे,सूत्रसंचालन अंजली गणेकर,आभार प्रदर्शन संचालिका मोनाली मुरकुटे यांनी केले तर कार्यक्रमाकरीता केशव गुरूकुलच्या शिक्षीका मंडळीनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
स्व. मोहनराव मुरकुटे स्मृतीप्रित्यर्थ संस्थेतर्फे दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. यामध्ये पाणी फाऊंण्डेशन ,श्रमदान,शेततळे , मजूरांना टोपले,फावडे,कुदळी इ साहित्य वाटप, अल्पोपहार,पाणी वाटप, अपंग, मतिमंद मुलांच्या शाळेत विविध स्पर्धा,वृक्षारोपन, रक्तदान शिबीराचे आयोजन,कपडे व भोजन वाटप,विदर्भस्तरीय धर्मराज पुरस्कार वितरण इ.कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येत असतात. असे वृत्त संस्थाध्यक्षा राधाताई मुरकुटे,कारंजा यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....